235 Australian leaders, including former prime minister, banned from entry. Esakal
ग्लोबल

Australia: माजी पंतप्रधानासह 235 ऑस्ट्रेलियन नागरिकांना प्रवेश बंदी, रशियाने का उचलले इतके कठोर पाऊल?

Russia Ukraine War: 24 फेब्रुवारी 2022 पासून रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. युद्धाला दोन वर्षे पूर्ण झाली आहे. या युद्धाने लाखो लोकांचे प्राण घेतले आणि जगभरातील अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे.

आशुतोष मसगौंडे

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने ऑस्ट्रेलियातील 235 व्हिक्टोरियन आणि दक्षिण ऑस्ट्रेलियन राजकीय नेत्यांना देशात प्रवेश करण्यास अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे. या यादीत माजी पंतप्रधान डॅन अँड्र्यूज यांचाही समावेश आहे.

मंत्रालयाने सांगितले की, काही काळांपूर्वी ऑस्ट्रेलियाने रशियन व्यक्ती आणि संस्थावर अर्थिक दंड आणि प्रतिबंध लादले होते. जे राजकीयदृष्ट्या प्रेरित होते. त्याला उत्तर म्हणून रशियाने ही कारवाई केली आहे.

रशियाने बंदी घातलेले हे राजकारणी रशियाविरोधी अजेंड्याला सक्रियपणे प्रोत्साहन देत आहेत, असे आरोपही रशियाने म्हटले आहे.

या यादीत 235 विद्यमान आणि माजी व्हिक्टोरियन आणि दक्षिण ऑस्ट्रेलियन खासदारांची नावे आहेत. व्हिक्टोरियन राजकारण्यांमध्ये डेप्युटी प्रीमियर बेन कॅरोल, खजिनदार टिम पॅलास, विरोधी पक्षनेते जॉन पेसुटो आणि माजी प्रीमियर डॅन अँड्र्यूज यांचा समावेश आहे.

या यादीतील दक्षिण ऑस्ट्रेलियन राजकारण्यांमध्ये डेप्युटी प्रीमियर सुसान क्लोज, कोषाध्यक्ष स्टीफन मुलिघन आणि विरोधी पक्षनेते डेव्हिड स्पेयर्स यांचा समावेश आहे.

जर ऑस्ट्रेलियन सरकारने आपली रशियाविरोधी भूमिका सोडली नाही तर ते यादी अद्ययावत करत राहतील असे रशियाने म्हटले आहे.

2022 मध्ये युक्रेनवर आक्रमण सुरू केल्यानंतर, अनेक देशांनी रशियाकडून आयात आणि निर्यात थांबवली आणि रशियन नागरिक आणि संस्थांवर निर्बंध लादले.

ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, युक्रेनच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या देशाने रशियावर स्वायत्त निर्बंध लादले.

मंत्रालयाने आपला प्रवासी मार्गदर्शक सूचनादेखील अद्यतनित करत आपल्या नागरिकांना रशियाला न जाण्याचा सल्ला दिला.

दरम्यान, 24 फेब्रुवारी 2022 पासून रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. युद्धाला दोन वर्षे पूर्ण झाली आहे. या युद्धाने लाखो लोकांचे प्राण घेतले आणि जगभरातील अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे.

युक्रेनमधील लाखो लोक बेघर झाले आणि शहरे नष्ट झाली. युद्धाला आता तिसरे वर्ष सुरू झाले आहे पण युद्धविराम होण्याची शक्यता दिसत नाही.

दरम्यान, अमेरिकाही हात वर करताना दिसली पण युक्रेन अजूनही मदतीची अपेक्षा करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजितदादा माफ करा, पदरात घ्या; लेकाने बोट दाखवून चॅलेंज दिल्यानंतर राजन पाटलांची माफी

Mumbai Metro: मुंबई मेट्रोमधून थेट बुलेट ट्रेन आणि रेसकोर्सला जोडणी; दोन नवे सबवे उभारण्याची तयारी, कुठे आणि कधी? जाणून घ्या...

Wagholi Accident : वाघोलीत थांबलेल्या ट्रकला धडक; सेफ्टी लाइट नसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार!

Latest Marathi Breaking News Live Update : कागल मध्ये मुश्रीफ गटाच्या उमेदवारासाठी शिंदे गटाची माघार

Gutkha Ban: आता गुटखा विक्रेत्यांची खैर नाही! फक्त बंदी नाही, थेट मकोका...; महाराष्ट्र सरकारचा मोठा धडाका

SCROLL FOR NEXT