school bus catches fires esakal
ग्लोबल

हृदयद्रावक ! पिकनिकला निघालेल्या शाळेच्या बसने अचानक घेतला पेट, २५ मुलांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती

School Bus Catches Fire : सुमारे ४४ विद्यार्थी आणि शिक्षक प्रवासी असलेल्या एका स्कूल बसला आग लागली. त्यापैकी २५ जणांचा मृत्यू झाल्याची भीती वृत्त एजन्सी एपीने सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली आहे.

Swadesh Ghanekar

Thailand’s Bangkok 25 feared dead as school bus catches fire : मंगळवारी दुपारी मनला सून्न करणारी बातमी समोर आली आहे. बँगकॉक, थायलंड येथे एका शाळेच्या बसने पेट घेतला आणि यात ४४ विद्यार्थ्यांसह शिक्षक होते. त्यापैकी २५ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचे वृत्त AP या एजन्सीने दिली आहे. AP न्यूज एजन्सीने एका सरकारी अधिकाऱ्याचा हवाला देताना २५ जणं दगावल्याचे वृत्त दिले आहे.

१६ विद्यार्थी व ३ शिक्षकांना उपचारासाठी तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आहे. परिवहन मंत्री सरिया जुआंगरूंगरुंगकित यांनी ही माहिती देताना घटनेची चौकशी केली जाईल, असे सांगितले.

राजधानीच्या उत्तरेकडील उपनगरातील पाथुम थानी प्रांतात दुपारच्या सुमारास या बसला आग लागली. मध्य उथाई थानी प्रांतातून ४४ जणांना घेऊन शाळेच्या सहलीसाठी ही बस अयुथयाकडे जात होती. तेव्हा ही आग लागली. प्रवाशांपैकी कोणाचाही मृत्यू झाला आहे, की नाही याची पोलिसांनी तात्काळ पुष्टी केली नाही. पण, गृहमंत्री अनुतिन चर्नविराकुल यांनी सांगितले की, वाचलेल्यांच्या संख्येनुसार २५ लोकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या Video मध्ये या बसला लागलेली आग किती गंभीर होती, हे दिसते. संपूर्ण बस आगीत जळून खाक झाल्याचे दिसत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. मंत्री चर्नविराकुल यांनीही सांगितले की, बचावकर्ते सुरक्षितपणे आत जाण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु बस अजूनही खूप गरम आहे. आग विझवल्यानंतर काही तासांत मृतदेह बसमध्येच आहेत.

दरम्यान, एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, एक टायर फुटल्यानंतर बस बॅरियर्सवर आदळली आणि त्यानंतर आग लागली. पंतप्रधान पेटोंगटार्न शिनावात्रा X वर लिहीले की,“एक आई म्हणून मी कुटुंबियांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करू इच्छिते.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT