bangladesh 
ग्लोबल

मालवाहतूक जहाजाची छोट्या बोटीला टक्कर; बांगलादेशात 26 जणांचा मृत्यू

सकाळन्यूजनेटवर्क

ढाका : शंभराहून अधिक प्रवासी असलेल्या एका छोट्या फेरी बोटीची मालवाहतूक जहाजाला धडक बसल्याने बोट बुडून झालेल्या अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला. नारायणगंज जिल्ह्यातील शितालाख्या नदीत ही घटना घडली. या घटनेनंतर तातडीने बचाव कार्याला सुरुवात झाली आणि मृतदेहांना बाहेर काढण्यात आले. विशेष म्हणजे, धडक बसल्यानंतर मालवाहतूक जहाज तिथून निघून गेले. या अपघाताची चौकशी करण्यासाठी सात सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांना २५ हजार टंका मदत जाहीर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नदीमध्ये सय्यदपूर कोयला घाटाजवळ प्रवासी बोट ‘एमएल सबीत अल हसन’ आणि मालवाहतूक जहाज ‘एसकेएल-3’ यांच्यात टक्कर झाली. पोलिसांनी सांगितल्यानुसार, टक्कर दिल्यानंतर मालवाहतूक जहाज तिथून निघून गेले. स्थानिक उपायुक्त मुस्तैन बिला यांनी सांगितलं की, घटनेचा तपासासाठी अतिरिक्त जिल्हा मॅजिस्ट्रेटच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती स्थापन केली गेली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT