afghanistan esakal
ग्लोबल

Afghanistan Blast: अफगाणिस्तानातील हॉटेलमध्ये भीषण स्फोट; 3 लोकांचा मृत्यू,7 जखमी

सकाळ डिजिटल टीम

blast at hotel in Afghanistan

काबुल- अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांतातील एका हॉटेलमध्ये स्फोट झालाय, यात तीन लोकांचा मृत्यू झालाय तर सात लोक गंभीर जखमी झाल्याचे कळत आहे. स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पाकिस्तानला लागून असलेल्या भागातील ही घटना आहे. या क्षेत्रात संघर्षाचा इतिहास असून इस्लामी दहशतवादी आणि त्यांच्या शत्रूमध्ये झटापटी होत असतात. याठिकाणी वेगवेगळ दहशतवादी गट सक्रीय आहेत. माहितीनुसार, जखमींमध्ये पाकिस्तानच्या वजीरिस्तान भागातील लोकांचा समावेश आहे. (3 killed 7 injured in blast at hotel in Afghanistan khost region)

पाकिस्तानच्या दुतावासाकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारला इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांकडून विरोध सहन करावा लागत आहे. आयएसने गेल्या काही महिन्यांमध्ये नागरिक, परदेशी नागरिक आणि तालिबानी सुरक्षा रक्षकांवर हल्ला करुन त्याची जबाबदारी घेतली आहे. तालिबानकडून आयएसचा प्रतिकार केला जात असून त्यांच्या अनेक अड्ड्यांवर छापा टाकण्यात आला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT