Gun Crime
ग्लोबल

पिस्तुलाशी खेळ पडला महागात; गोळी लागून आईचा मृत्यू

घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी मुलाच्या वडिलांना अटक केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

प्रवासादरम्यान गाडीत बंदुकीशी खेळणे एका परिवाराला महागात पडले असून, तीन वर्षाच्या मुलाच्या हातातील बंदुकीतून सुटलेल्या गोळीने चिमुकल्याच्या आईचा मृत्यू झाला आहे. ही घटना शिकागोमधील मिडवेस्टर्न शहरातील डोल्टनमधील एका सुपरमार्केटच्या पार्किंगमध्ये घडली. (Boy Kills Mother While Playing With Gun In America)

कशी घडली घटना?

तीन वर्षांचा मुलगा कारच्या मागच्या सीटवर बसला होता. तर त्याचे आई-वडील समोरच्या सीटवर बसले होते. यादरम्यान मुलाच्या हातात वडिलांचे पिस्तूल लागले. त्यानंतर बंदुकीशी खेळताना मुलाने अचानक ट्रिगर खेचला. त्यावेळी बंदुकीतून सुटलेली गोळी समोर बसलेल्या त्याच्या आईच्या मानेवर लागली. त्यानंतर महिलेला शिकागोच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र, तेथे तिला मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी मुलाच्या वडिलांना (Father) अटक केली असून, त्यांच्याकडे बंदूक बाळगण्याचा परवाना होता की नाही? याचा तपास पोलीस करत आहेत. धक्कादायकबाब म्हणजे यूएसमध्ये (US) अल्पवयीन मुलांनी अनावधानाने केलेल्या गोळीबारामुळे दरवर्षी सरासरी 350 लोकांचा मृत्यू होतो, अशी माहिती एव्हरीटाउन फॉर गन्सच्या अलीकडील अहवालातून समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

Plane Service : मोठी बातमी! सोलापूर ते मुंबई विमानसेवा सप्टेंबरपासून होणार सुरू; 'डीजीसीए'कडून स्टार एअरला परवानगी

NCP News: सुनेत्रा पवार संघाच्या कार्यक्रमात, रोहित पवार भडकले, काय म्हणाले?

Beed News: सरकारी वकिलाचं टोकाचं पाऊल, कुटुंबाच्या मागणीने मोठा ट्विस्ट, बीड हादरलं..

Pune News : ठेकेदारावर पीएमपीने कारवाई केली, महापालिका कधी करणार? मनसेचा महापालिकेला प्रश्‍न

SCROLL FOR NEXT