30% of the world's corona patients in a single country; The President himself expressed fears of more than 5 lakh deaths 
ग्लोबल

अबब !!! जगातील ३० % कोरोना रुग्ण एकाच देशात; 5 लाखांपेक्षा जास्त मृत्यू होण्याची स्वतः राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केली भीती 

सकाळवृत्तसेवा

वाशिंग्टन (अमेरिका): सध्या संपूर्ण जगात धुमाकूळ घालत असलेला कोरोना विषाणू काही थांबायचे नाव घेत नाहीये. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात चीनच्या वुहान प्रांतात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर जानेवारीमध्ये कोरोनाने युरोपमध्ये पसरण्यास सुरवात केली. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेत कोरोनाचा प्रभाव दिसायला सुरवात झाली होती. सध्या संपूर्ण जगात सर्वात जास्त अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव असून सध्या अमेरिकेत जवळपास 10 लाख कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. सध्या अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा पटीत वाढत असून संपूर्ण जगातील कोरोनाच्या संसर्गाचे तब्ब्ल 30 % रुग्ण हे एकट्या अमेरिकेत आहेत. 

संपूर्ण जगात सध्या काय आहे स्थिती:
सध्या जगातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने 30 लाखाचा टप्पा ओलांडला असून आता तो दिवसाला जवळपास 70 हजाराच्या आकड्याने वाढत आहे. सध्या संपूर्ण जगात कोरोनाचे एकूण 30 लाखापेक्षा जास्त रुग्ण असून त्यातील 2.7 लाख रुग्णांचा त्यात मृत्यू झाला आहे. सध्या कोरोनाच्या 19.14 लाख रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर एकूण 8.82 लाख रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. रविवारी एकाच दिवसात कोरोनाच्या नवीन 73,858 रुग्णांची नोंद झाली असून 3751 रुग्णांचा एकाच दिवसात मृत्यू झाला आहे. 

अमेरिकेत कोरोनाची काय आहे स्थिती:
जगात सर्वात जास्त कोरोनाचा प्रादुर्भाव हा अमेरिकेत दिसून आला असून आता अमेरिका 10 लाख संक्रमणाच्या टप्प्यावर आहे. सध्या अमेरिकेत 9.87 लाख कोरोनाग्रस्त रुग्ण असून 55,415 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर कोरोना निदानाच्या चाचण्या घेण्यात येत असून आतापर्यंत 54.70 लाख चाचण्या घेण्यात आल्या आहेत. अमेरिकेत सध्या 8.13 लाख रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असून 1.18 लाख रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. रविवारी एकाच दिवसात अमेरिकेत 26509 नवीन संक्रमणाची प्रकरणे समोर आली असून एकाच दिवसात 1157 रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  

अमेरिका आता 10 लाखाच्या टप्प्यावर : ट्रम्प 
अमेरिकन राष्ट्राद्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी संध्याकाळी पत्रकारांशी बोलताना अमेरिका सध्या 10 लाख संक्रमणाच्या टप्प्यावर असल्याचे जाहीर केले. हे  कोरोनाच्या संक्रमणाचे शिखर असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेत जर हा ट्रेंड असाच सुरु राहिला तर 5 लाख मृत्यू होण्याची भीती ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC बंडखोरांना राज्यात १३०० मतं मिळवू न शकलेल्या पक्षाचा आधार, शून्यावरून थेट २० खासदार; NCPIचा इतिहास काय? कोण चालवतं?

सरळसेवा पदभरतीची महत्त्वाची फाईल गहाळ, राजशिष्टाचार विभागात खळबळ; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Nashik Vegetable Prices : किचनचे बजेट कोलमडले! टोमॅटो 80 तर वांगी 120 रुपये किलो; पाहा तुमच्या आवडीच्या भाज्यांचे ताजे दर, फळेही सामान्यांच्या आवाक्याबाहेर

VIRAL VIDEO: जिंकण्यापूर्वीच खेळाडू सेलिब्रेशन करण्यासाठी मैदानात धावले, फिल्डरची चतुराई पाहून सारेच चक्रावले; अम्पायरही गोंधळले

Latest Marathi News Live Update : नाशिक जिल्हयातील नागा-साक्या धरणाने गाठला तळ

SCROLL FOR NEXT