ग्लोबल

नायजेर हादरले! अंदाधुंद गोळीबार, 14 मुलांसह 37 जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

पश्चिम आफ्रिकेतील नायजेर देशात अज्ञात बंदुकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याचे वृत्त समोर आलं आहे. या गोळीबारात 37 जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. यामध्ये 14 लहान मुलं आणि चार महिलांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, हा दहशतवादी हल्ला आहे. नायजरमध्ये कट्टरतावादी संघटनांची चांगलीच दहशत आहे. येथे कायमच सुरक्षा दल आणि सामान्य नागरिकांवर हल्ले होत राहतात.

स्थानिक आधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षात नायजेर देशात दहशतवाद्यांनी शेकडो नागरिकांचे प्राण घेतले आहेत. नायजेरमधील तिलबेरी क्षेत्रातील बानीबांगोमध्ये अज्ञात बंदुकधाऱ्यांनी जमावावर अंदाधुंत गोळीबार केला. यामध्ये 37 जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. एएफपीच्या वृत्तानुसार, सोमवारी दुपारी डेरे-डे या गावात काही अज्ञात बंदुकधारी लोक दुचाकीवरुन आले आणि शेतात काम करणाऱ्यांवर गोळीबार केला. यामध्ये 37 नागरिकांना आपले प्राण गमावावे लागले.

नायजेरच्या सैन्याने या हल्ल्यानंतर हाय अलर्ट जारी करत संपूर्ण परिसरात शोध मोहिम सुरू केली आहे. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी विशेष सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. आफ्रिकेच्या काही भागात जिहादी संघटना ISIS (इस्लामिक स्टेट) आणि अल कायदाचा प्रभाव आहे. हे हल्लेखोर माली आणि बुरकीना फासोच्या सीमावर्ती भागातही हल्ले करतात. एचआरडब्ल्यूने गेल्या आठवड्यात जारी केलेल्या एका रिपोर्ट्सनुसार, वर्षभरात नायजेरमध्ये दहशतवादी हल्ल्यात 420 जणांचा मृत्यू झाला. यंदा तिलबेरी आणि तहौआमध्ये सर्वाधिक दहशतवादी हल्ले झाले. या हल्ल्यात अनेक दिव्यांग आणि लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण अनाथ झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT