child hand  e sakal
ग्लोबल

आंघोळ करताना साबणाच्या फेसामुळे आग; चिमुकला होरपळला

सकाळ डिजिटल टीम

लिवरपूल (इग्लंड) : एक महिला आपल्या चार वर्षीय चिमुकल्याला आंघोळ घालत असताना एक धक्कादायक घटना घडली. आंघोळ करताना मुलाला साबण लावताच फेस तयार झाला. पाहता पाहता त्या फेसामध्ये आग लागली आणि मुलाचं शरीर पूर्ण जळालं. त्यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इंग्लंड येथील लिवरपूल (Liverpool, England) येथे ही घटना घडली.

स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, पीडित मुलाचे नाव ऑस्कर बेडार्ड आहे. त्याचे वडील जोगाथन यांनी सांगितले, की ते त्यांच्या मुलाला आंघोळ घालत होते. त्यावेळी बाथरूमध्ये काही मेणबत्त्या देखील जळत होत्या. त्यामुळे ऑस्कर आंघोळ करताना खुश होता. त्याच्या अंगाला साबण लावताच फेस तयार झाला आणि त्या फेसामध्ये अचानक आग लागली. यामध्ये चेहऱ्यापासून तर पायापर्यंत ऑस्कर गंभीररित्या भाजला होता. अचानक आग लागल्याचे पाहून पालकांना धक्का बसला. पती-पत्नी दोघांनीही रुग्णालयाकडे धाव घेतली. चिमुकल्या ऑस्करवर बालरोतज्ज्ञांकडून उपचार करण्यात आले.

साबणामुळे जळालं शरीर?

लहान मुलांची त्वचा खूपच संवेदनशील असते. त्यामुळे मुलांसाठी रसायन नसलेले प्रोडक्ट्स वापरले जातात. मात्र, अनेकवेळा गरीबीमुळे पालक आपल्या मुलांसाठी स्वस्त प्रोडक्ट घेतात. त्या प्रोडक्टमुळे मुलांना काय धोका निर्माण होऊ शकतो याबाबत पालकांना तितकी माहिती नसते. ऑस्करसोबत पण नेमकं हेच झालं. साबणामुळे त्यांचं शरीर भाजल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर त्या साबणाच्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती ऑस्करचे वडील जोगाथन यांनी स्थानिक माध्यमांना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP जॉइन करा अन् दर महिन्याला 50 हजार कमवा! असा मेसेज सगळीकडे का होतोय व्हायरल? यामागचा स्कॅम पाहून बसेल धक्का

Pune Riksha Fare: पुणेकरांना मोठा झटका! रिक्षाभाडेवाढीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात; लवकरच नवे दर हाेणार लागू

Almatti Dam Controversy : आलमट्टीच्या उंचीवरून कर्नाटकची मनमानी! महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात जावे; तज्ज्ञांचं आवाहन, काय म्हणाले केंगार?

Child Murder Case: एआयच्या मदतीने चिमुकल्याची हत्या! बिश्नोई गँगच्या नावाने १९९ रुपयांत सिमकार्ड खरेदी; कसा रचला भयानक कट?

Mumbai News: ना नोटीस, ना आदेश! जन्म-मृत्यू दाखल्यांच्या दुरुस्तीचे काम ठप्प, शाळा-कॉलेज प्रवेशासाठी धडपडणारे विद्यार्थी संकटात

SCROLL FOR NEXT