Taliban esakal file photo
ग्लोबल

तालिबानच्या राजवटीत 400 नागरिक मारले गेले, UN च्या अहवालात खुलासा

तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर हा पहिलाच मोठा मानवाधिकार अहवाल आहे.

सकाळ डिजिटल टीम

काबूल : तालिबानने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) झालेल्या विविध हल्ल्यांमध्ये जवळपास 400 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 80 टक्के नागरिक इस्लामिक स्टेटशी (Islamic State) संलग्न असलेल्या गटांच्या हल्ल्यात मरण पावले आहेत. संयुक्त राष्ट्राने जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. हा अहवाल आल्यानंतर तालिबानच्या राजवटीत अफगाणिस्तानात अतिरेकी किती प्रमाणात वाढला आहे, हे स्पष्ट झाले आहे. तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर हा पहिलाच मोठा मानवाधिकार अहवाल आहे. या अहवालात ऑगस्ट 2021 ते फेब्रुवारी 2022 अखेरपर्यंतची आकडेवारी देण्यात आली आहे. (UN Report On Taliban Government )

अमेरिकेच्या माघारीनंतर कब्जा

ऑगस्ट 2021 मध्ये, जेव्हा अमेरिकन सैनिक (American Army) 20 वर्षांचे युद्ध संपवून अमेरिकेत परतत होते, तेव्हा तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला. तेव्हापासून अफगाणिस्तानात इस्लामिक संघटनांचे हल्ले वाढले आहेत. अफगाणिस्तान आता महिला, पत्रकार आणि इतर अनेक गटांसाठी योग्य नसल्याचेही अहवालाता नमुद करण्यात आले आहे. या अहलावात इस्लामिक स्टेट खोरासान (ISIS-K) या संघटनेने केलेल्या हल्ल्यांमध्ये 397 नागरिकांचा मृत्यू झाल्याचेही सांगण्यात आले आहे.

यूएनच्या अहवालानुसार इस्लामिक स्टेट खोरासान ही जागतिक दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटची अफगाणिस्तानस्थित शाखा आहे. या काळात या दहशतवादी गटाशी संबंध असलेल्या 50 हून अधिक लोकांना मारण्यात आले आहे. त्यापैकी काहींचा छळ करण्यात आला, काहींचा शिरच्छेद करण्यात आला तर, अनेकांना रस्त्याच्या कडेला फेकण्यात आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.

अनेक अफगाण लोकांसाठी मानवी हक्कांची परिस्थिती चिंतेची बाब आहे. 2014 च्या उत्तरार्धात पूर्व अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक स्टेट खोरासान पहिल्यांदा दिसून आले होते. तालिबानने ताबा घेतल्यानंतर त्याची ताकद वाढली असून, अलीकडच्या काही महिन्यांत त्यांनी अनेक आत्मघाती हल्ले केले असल्याचे मानवाधिकार उच्चायुक्त मिशेल बॅचेलेट यांनी अहवाल सादर करताना भाषणात सांगितले आहे. यात गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये काबूल विमानतळावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याचा समावेश आहे. ज्यामध्ये 13 अमेरिकन सैनिकांसह अनेक सामान्य लोकही मारले गेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT