Israel-Hamas War Esakal
ग्लोबल

Israel-Hamas War: हमाससोबतच्या युद्धामुळे इस्राइलमध्ये मनुष्यबळाची कमतरता; आता भारतातून 6,000 कामगार करणार आयात

Israel-Hamas War: G2G करारांतर्गत 6000 कामगारांना इस्राइलमध्ये नेले जात आहे. गेल्या मंगळवारी भारतातील ६४ कामगार इस्राइलला पोहोचले. एप्रिलच्या मध्यापर्यंत एकूण 850 कामगार इस्राइलला पोहोचण्याची अपेक्षा आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Israel-Hamas War: इस्राइल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. अशा परिस्थितीत इस्राइलच्या बांधकाम क्षेत्रात कामगारांची कमतरता भासत आहे, त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात भारतातून सहा हजार कामगार इस्राइलला जाणार आहेत. इस्राइल सरकारने बुधवारी रात्री उशिरा एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. इस्राइलचे पंतप्रधान कार्यालय (पीएमओ), वित्त मंत्रालय आणि बांधकाम आणि गृहनिर्माण मंत्रालय यांनी चार्टर फ्लाइटला सबसिडी देण्याच्या संयुक्त निर्णयानंतर कामगारांना एअर शटलने इस्राइलला आणण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले, असे निवेदनात म्हटले आहे.

पॅलेस्टाईनमधील 97,000 कामगार इस्राइलमध्ये काम करत होते

इस्त्रायली बांधकाम उद्योग विशिष्ट क्षेत्रांमध्ये कामगारांना काम देतो जेथे इस्त्रायली कामगारांची कमतरता आहे. युद्धापूर्वी, 80,000 कामगार वेस्ट बँकमधून इस्राइलमध्ये आले होते आणि 17,000 कामगार गाझा पट्टीतून आले होते, परंतु युद्ध सुरू झाल्यापासून, बहुतेक कामगारांचे कामाचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. युद्धामुळे देशात कामगारांची मोठी कमतरता होती, त्यामुळे अनेक प्रकल्प रखडले होते.त्यामुळे लोकांना उदरनिर्वाहासाठी अडचणी येऊ लागल्या.

850 कामगार एप्रिलच्या मध्यापर्यंत इस्राइलला पोहोचतील

निवेदनानुसार, G2G करारांतर्गत 6000 कामगारांना इस्राइलमध्ये आणले जात आहे. गेल्या मंगळवारी भारतातील ६४ कामगार इस्राइलला पोहोचले. एप्रिलच्या मध्यापर्यंत एकूण 850 कामगार इस्राइलला पोहोचण्याची अपेक्षा आहे. इस्राइलमध्ये येणाऱ्या निवडक कामगारांपैकी बहुतेकांनी नोकरीचा राजीनामा दिला असून ते इस्राइलमध्ये येण्यासाठी व्हिसाच्या प्रतीक्षेत असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. भारत आणि श्रीलंका व्यतिरिक्त सुमारे 7,000 कामगार चीनमधून आणि 6,000 कामगार पूर्व युरोपमधून येत आहेत.

भारतीय राजदूत संजीव सिंगला यांनी इस्राइलच्या कामगार मंत्र्यांची घेतली भेट

इस्राइलमधील भारताचे राजदूत संजीव सिंगला यांनी बुधवारी देशाचे कामगार मंत्री, योव बेन-त्झूर यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली आणि भारतीय कामगारांच्या सुरक्षिततेचा आणि कल्याणाचा मुद्दाही उपस्थित केला. बैठकीदरम्यान, त्यांना भारतीय कामगारांच्या कल्याणासाठी इस्रायली मंत्रालयाच्या अंमलबजावणी उपक्रमांची माहिती देण्यात आली.

इस्राइलमधील भारतीय दूतावासाने ट्विटरवर सांगितले की, बैठकीदरम्यान सिंगला यांना इस्राइलमधील भारतीय कामगारांचे हक्क आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी मंत्रालयाच्या अंमलबजावणी उपक्रमांबद्दल माहिती देण्यात आली. गेल्या आठवड्यात G2G कराराअंतर्गत भारतीयांची पहिली तुकडी इस्राइलला पोहोचली. भारताने इस्रायली अधिकाऱ्यांना त्यांच्या सुरक्षेचा गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन केले आहे. वर्षाच्या सुरुवातीला, हरियाणातील रोहतक येथील महर्षि दयानंद विद्यापीठात इस्राइलमध्ये 10,000 हून अधिक भारतीय बांधकाम कामगारांची भरती करण्याची मोहीम सुरू झाली. सध्या सुमारे १८,००० भारतीय कामगार इस्राइलमध्ये आहेत.

इस्राइलच्या पंतप्रधानांनी पीएम मोदींशी केली चर्चा

इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. या काळात कामगारांच्या प्रश्नावरही चर्चा झाली. इस्रायइलचे अर्थमंत्री निर बरकत यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये भारत दौऱ्यावर असताना भारतीय मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन कामगारांच्या प्रश्नावर चर्चा केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT