(A friend in need is a friend indeed PM Modi says in Papua New Guinea 
ग्लोबल

PM Modi: 'अ फ्रेंड इन नीड इज अ...' पापुआ न्यू गिनीमध्ये पंतप्रधान मोदींचे मोठं वक्तव्य

नरेंद्र मोदी पापुआ न्यू गिनीत आयोजित एचआयपीआयसी शिखर संमेलनात सहभागी झाले.

धनश्री ओतारी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या दौऱ्याच्या गेले आहेत. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात ते पापुआ न्यू गिनी या देशात गेले आहेत. नरेंद्र मोदी पापुआ न्यू गिनीत आयोजित एचआयपीआयसी शिखर संमेलनात सहभागी झाले आहेत. दरम्यान यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. (A friend in need is a friend indeed PM Modi says in Papua New Guinea )

पंतप्रधान मोदी समकक्ष जेम्स मारापे यांच्यासह फोरम फॉर इंडिया-पॅसिफिक बेटे कोऑपरेशन (FIPIC) च्या तिसऱ्या शिखर परिषदेला उपस्थित होते. या परिषदेत पंतप्रधान मोदींनी अडचणीच्या काळात भारत आपल्या मैत्रीपूर्ण पॅसिफिक बेट देशांच्या पाठीशी उभा राहिला याचा मला आनंद आहे.

भारत सर्व भागीदार देशांना आपल्या क्षमतेनुसार मदत करत आहे. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड' अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

नेमकं काय म्हणाले मोदी?

"कोविड महामारीचा सर्वाधिक परिणाम ग्लोबल साउथच्या देशांवर झाला. हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती, उपासमारी, गरिबी आणि आरोग्याशी संबंधित आव्हाने आधीच होती, आता इंधन, खत, फार्मा यासारख्या नवीन समस्या निर्माण होत आहेत.

अडचणीच्या काळात भारत आपल्या मैत्रीपूर्ण पॅसिफिक बेट देशांच्या पाठीशी उभा राहिला याचा मला आनंद आहे. भारत सर्व भागीदार देशांना आपल्या क्षमतेनुसार मदत करत आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे, माझ्यासाठी तुम्ही एक मोठा सागरी देश आहात, लहान बेट राज्य नाही.

तुमचा महासागर भारताला तुमच्याशी जोडतो. ज्यांना आपण आपले मानले, ते गरजेच्या वेळी सोबत नसल्याची जाणीव झाली 'अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड' ही जुनी म्हण खरी ठरली, अशी भावना पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT