Nepal  sakal
ग्लोबल

Nepal : नेपाळमध्ये ‘प्रचंड’ सरकारला धक्का;सत्ता स्थापनेसाठी शेरबहादूर देऊबा आणि ओली एकत्र

नेपाळमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत आज नेपाळी काँग्रेस आणि सीपीएन-यूएमएल या दोन मोठ्या पक्षांनी नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आघाडी जाहीर केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

काठमांडू : नेपाळमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत आज नेपाळी काँग्रेस आणि सीपीएन-यूएमएल या दोन मोठ्या पक्षांनी नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आघाडी जाहीर केली आहे. विद्यमान पंतप्रधान पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ यांचे सरकार उलथवून टाकण्यासाठी या दोन्ही पक्षांमध्ये सोमवारी मध्यरात्रीपर्यंत चर्चा होऊन एकत्र येण्याचा निर्णय झाला. या घडामोडींनंतरही प्रचंड यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे.

नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देऊबा आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ -युनिफाईड मार्क्सिस्ट लेनिनिस्ट (सीपीएन-यूएमएल) पक्षाचे प्रमुख के. पी. शर्मा ओली यांच्यात काल रात्री प्रदीर्घ चर्चा झाली. या दोन्हीही नेते देशाचे माजी पंतप्रधान असून नव्याने सरकार स्थापन झाल्यावर आळीपाळीने पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारण्याचे दोन्ही नेत्यांमध्ये ठरले आहे. नेपाळी काँग्रेस हा संसदेतील सर्वांत मोठा पक्ष असून त्यांचे ८९ सदस्य आहेत, तर ओली यांच्या पक्षाचे ७८ सदस्य आहेत. या दोन्ही पक्षांचे एकत्रित संख्याबळ १६७ असून बहुमतासाठी आवश्‍यक असलेल्या १३८ जागांपेक्षा हे अधिक आहे. सध्या ओली आणि प्रचंड यांचे आघाडी सरकार सत्तेत आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांमध्ये सातत्याने होत असलेल्या वादाचीच परिणती सत्तांतर होण्यात होणार आहे.

प्रस्तावाला सामोरे जाऊ’

देऊबा आणि ओली यांनी नवीन राजकीय आघाडीबाबत चर्चा केल्यानंतर ओली यांनी प्रचंड यांच्या पक्षाशी असलेले सहकार्य थांबविण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे पंतप्रधान प्रचंड यांचे सरकार अल्पमतात गेले आहे. तरीही त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. राजीनामा देण्यापेक्षा आपण अविश्‍वास प्रस्तावाला सामोरे जाऊ, असे प्रचंड यांनी जाहीर केले आहे. मागील दीड वर्षांच्या सत्ताकाळात प्रचंड यांनी तीन वेळा विश्‍वासदर्शक ठराव जिंकला आहे.

अस्थिर नेपाळ

मागील काही वर्षांत नेपाळमधील राजकीय परिस्थिती अस्थिर बनली असून १६ वर्षांत येथे १३ वेळा सरकार स्थापन झाले आहे. कोणत्याही एका पक्षाला बहुमत नसणे आणि आघाडी करून सत्तेत आलेल्या पक्षांमध्ये वारंवात मतभेद होणे, ही यामागील प्रमुख कारणे मानली जातात. नेपाळमध्ये नव्या राजकीय चित्रात, पहिल्या टप्प्यात दीड वर्षांसाठी के. पी. शर्मा ओली हे पंतप्रधान होणार असून नंतर ही सूत्रे शेरबहादूर देऊबा यांच्याकडे जातील. नवीन सरकार स्थापन करणे, राज्यघटनेत सुधारणा करणे, मंत्रिमंडळ याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New aviation Rules For Pets : विमानात आता पाळिव प्राणी नेण्याबाबत नवीन सूचना जारी, हवाई वाहतूक मंत्रालयाने विमान कंपन्यांना दिले नवे आदेश

New IPO: गॅस संकटात ऊर्जा क्षेत्रातील या कंपनीचा 1,100 कोटींचा IPO! किती गुंतवणूक करावी लागणार? काय आहे कंपनी? जाणून घ्या

यंदाचा गुढीपाडवा ठरणार 'या' चार राशींना भाग्यशाली; सुरू होणार सुवर्णकाळ पण या राशींनी राहा सावध

IPL 2026 : आधी, नो लूक षटकार... मग कॉलर टाईट... हार्दिक पांड्याचा माज जसप्रीत बुमराहने तिसऱ्या चेंडूवर ठेचला Video Viral

Navi Mumbai: आदल्या दिवशी वाद; नंतर तलवार घेऊन तरुण हॉटेलमध्ये घुसला अन्... नवी मुंबईत मॅनेजरसोबत काय घडलं?

SCROLL FOR NEXT