Aaron Carter Claims On Twitter That His Late Sister Raped Him As A Child 
ग्लोबल

'सख्या बहिणीनेच माझ्यावर केला वारंवार बलात्कार'

वृत्तसंस्था

वॉशिग्टन : सख्ख्या बहिणीने माझ्यावर वारंवार बलात्कार केला असा गौप्यस्फोट अमेरिकेचा प्रसिद्ध पॉप सिंगर एरॉन कार्टरने केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने ट्विटरवर हा धक्कादायक खुलासा केला आहे.

एरॉन कार्टर म्हणतो 'माझी बहीण लेस्ली हिला दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाचा (बायपोलर) मानसिक आजार होता. आजारावर मात करण्यासाठी तिला लिथियमचे औषध दिले जात होते. या औषधोपचारांचा तिला खूप राग येत होता. जेव्हा ती औषधं घ्यायची नाही तेव्हा ती अशा गोष्टी करायची ज्या तिच्याकडून कधीच अपेक्षित नव्हत्या, असे एरॉनने म्हटलं आहे.
 

एरॉनने बहिणीबाबत हा धक्कादायक खुलासा केला असतानाच त्याचा भाऊ निकनेही एरॉनवर गंभीर आरोप केले आहेत. एरॉन हा माझ्या गर्भवती पत्नीला व मुलांना ठार मारण्याचा कट रचत आहे आणि त्याच्या भीतीने मी पोलिस संरक्षण मागितले आहे असं निकने म्हटलं आहे.

 

दरम्यान, एरॉनची बहीण लेस्ली कार्टरचा अंमली पदार्थाच्या अतिसेवनामुळे 2012 साली मृत्यू झाला. एरॉन दहा वर्षांचा असताना लेस्लीने त्याच्यावर बलात्कार केल्याचं म्हटलं आहे. वयाच्या तेराव्या वर्षांपर्यंत माझ्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं त्याने सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT