HINDU TEMPLE 
ग्लोबल

VIDEO: अबु धाबीतील भव्य हिंदू मंदिराचे बांधकाम जवळपास पूर्ण!

सकाळन्यूजनेटवर्क

अबु धाबी- संयुक्त अरब अमिरातीतील अबु धाबीमध्ये पारंपरिक पद्धतीने भव्य अशा हिंदू मंदिराची उभारणी जवळजवळ पूर्ण झाली आहे. एप्रिल महिन्यात या मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल असं मंदिराच्या प्रोजेक्ट इंजिनिअरने सांगितलंय. विशेष म्हणजे या मंदिराच्या उभारणीसाठी यूएई आणि भारत या दोन्ही देशात काम केलंय. अखेर मंदिराचे बांधकाम अंतिम टप्प्यात पोहोचसे असून अवघ्या एका महिन्याच्या आत निर्माणाचे काम पूर्ण होईल. गुजरात आणि राजस्थानमधील २ हजारपेक्षा अधिक शिल्पकारांनी घडवलेल्या दगडाच्या भिंती, त्यावरील सुंदर नक्षीकाम यूएईमध्ये मंदिराच्या उभारणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यामुळे या मंदिराचे पूर्णपणे पारंपरिक हिंदू पद्धतीचे असणार आहे. मंदिर एकदाचे पूर्ण झाल्यास ते जागतिक पर्यटनासाठी खुले केले जाणार आहे.  

BAPS स्वामीनारायण मंदिराची पायाभरणी २०२० च्या एप्रिलमध्येच झाली होती, पण कोरोना महामारीच्या संसर्गामुळे बांधकाम काही काळ थांबले होते. पण, डिसेंबर महिन्यापासून कामाने गती घेतली. बांधकाम सुरु असताना मंदिराचे काही फोटो समोर आले होते. त्यातून मंदिराची भव्यता दिसून येत होती. यूएईमधील हे पहिल्या प्रकारचे पारंपरिक हिंदू मंदिर असून BAPS स्वामीनाराणय संस्थेने या मंदिराची उभारणी केली आहे. मंदिर अबु मुरेखातील अल रहबा भागात उभारलं गेलंय. पूर्व मध्य आशियातील हे पारंपरिक प्रकारचे संपूर्णपणे दगडाने बनवले गेलेले पहिले हिंदू मंदिर आहे. 

मंदिर ५५,००० चौकिमीच्या विस्तृत्व जागेवर वसवलं गेलं असून यात सर्वप्रकारच्या सुविधा असणार आहेत. मंदिरात सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांसाठी कॉम्प्लॅक्स असणार आहेत. कॉम्प्लॅक्समध्ये भेट देणाऱ्यांसाठी केंद्र, प्रार्थना स्थळ, प्रदर्शन, शिक्षण क्षेत्र, लहान मुलांसाठी खेळ क्षेत्र, थीमॅटिक गार्डन, फूड कोर्ट, पुस्तके आणि गिफ्ट शॉप असणार आहेत. पार्किंगसाठी मोठी जागा करण्यात आली असून त्यात १२ हजार गाड्या आरामात पार्क होऊ शकतील. तसेच मंदिर परिसरात २ हेलीपॅड तयार करण्यात आलेत. 

ब्रह्मविहारी स्वामी इतर अधिकाऱ्यांसोबत मिळून BAPS हिंदू मंदिर उभारणीला अंतिम स्वरुप देताहेत. स्थानिक राज्यकर्त्यांनी या मंदिराच्या उभारणीसाठी पूर्ण पाठिंबा दिला होता. भारतामधून हातांनी घडवलेले शिल्पकाम यूएईमध्ये आणण्यात आले होते. यात भारताचा सांस्कृतिक इतिहास, देवी-देवता यांचे चित्रण दाखवले गेले. तसेच हिंदू धारणा आणि रामायण, महाभारतातील प्रसंग या शिल्पामधून दिसून येतील.  यूएईच्या ७ राज्यकर्त्यांना दर्शवणारे सात शिखर मंदिराला आहेत. मंदिराचे बांधकाम अखेर पूर्ण होत आहे.

दरम्यान, भारतातून अनेक लोक कामासाठी यूएईमध्ये जातात. अनेक लोक तेथेच जाऊन स्थायिक झाले आहे. यूएईच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास ३० टक्के लोक भारतीय आहेत. यूएईमधील हिंदू मंदिराच्या उभारणीमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक विस्तारले जाणार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT