ग्लोबल

२६/११च्या सूत्रधारांवर व्हावी कारवाई; मोदी-बायडेन भेटीनंतर संयुक्त निवेदन

सकाळ डिजिटल टीम

वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिकेने दहशतवादाविरोधात एकत्रित लढा देण्याचा निर्धार केला आहे. सर्वच दहशतवादी संघटना आणि समूह यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देतानाच सीमेपलीकडून चालणाऱ्या दहशतवादी कारवायांचाही कठोर शब्दांत निषेध करण्यात आला. मुंबईवर २६/११ रोजी भीषण हल्ला घडवून आणणाऱ्या सूत्रधारांवर कारवाई केली जावी असे मत मांडण्यात आले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या भेटीनंतर हे संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. अफगाणिस्तानात सध्या सत्ताधारी बनलेल्या तालिबान्यांनी त्यांच्या भूमीचा दहशतवादी कारवायांसाठी वापर होऊ देता कामा नये असेही उभय देशांकडून बजावण्यात आले.

पाकिस्तानने दहशतवादी संघटनांविरोधात ठोस कारवाई करावी आणि मुंबईवर हल्ला करणाऱ्यांचा निवाडा करावा असे आग्रही मत मांडले. विशेष म्हणजे मागील महिन्यात भारताच्या अध्यक्षतेखाली संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक पार पडली होती. या बैठकीतच अफगाणिस्तानातील दहशतवादी कारवायांना पायबंद घालण्यात यावा अशी मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Rahuri By-Election: अक्षय कर्डिलेंवरच भाजपचा भरवसा; राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर, विखे पिता-पुत्रांची कर्डिलेंनाच पसंती?

ठरलं तर मगमधील प्रियासाठी सायलीच्या खऱ्या आईने बनवला खास पदार्थ, अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली...

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT