ग्लोबल

प्रौढ खेळण्याला दिला माजी महिला सैनिकाचा चेहरा; अन्...

सकाळ डिजिटल टीम

प्रौढ खेळण्यांसाठी जगात मोठी बाजारपेठ आहे. ही खेळणी खुलेआम विकली जात नसली तरी इतर गोष्टींप्रमाणे त्यांनाही जाहिरातीची गरज आहे. या बाहुल्यांचे चेहरे बनवणे हे निर्मात्यांसाठी मोठे आव्हान आहे. कारण, कोणत्याही महिलेचा चेहरा परवानगीशिवाय वापरता येत नाही. मात्र, काही निर्मात्यांनी हे कृत्य केल्यावर महिलेने त्यावर तीव्र आक्षेप घेत तक्रार नोंदवली आहे.

सेक्स डॉल कंपनीने महिलेच्या परवानगीशिवाय चेहरा सेक्स डॉलसाठी वापरल्याची तक्रार इंस्टाग्राम अकाउंटवर केली आहे. इस्राईल संरक्षण दलाची माजी सैनिक येल कोहेन एरिस (२५) ही सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. तसेच तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. तिने इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, ‘मला कळले की एका मोठ्या कंपनीने माझ्या परवानगीशिवाय किंवा माझ्या नकळत माझ्यासारखी सेक्स डॉल बनवली आहे.’ हा कोणत्याही प्रकारचा मजाक नाही तर सत्य आहे.

कंपनीने या बाहुलीचे नाव ‘येल’ ठेवले आहे. या प्रकारामुळे मला धक्का बसला आहे. काय करावे हे समजत नाही आहे. मी हे तुमच्यासोबत शेअर करीत आहे. एवढेच नाही तर कंपनीने येलच्या ओठाखाली बनवलेल्या बर्थमार्कचीही कॉपी केली आहे. येल कोहेन एरिस कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करीत आहे.

याबद्दल कळले तेव्हा मला धक्काच बसला. कारण, डॉलचा चेहरा खूप ओळखीचा होता. तरीही याकडे फारसे लक्ष दिले नाही. मात्र, टीव्हीवर आल्याने संतापलेल्या येलने कंपनीशी संपर्क साधला आणि बाहुलीला हटवण्याची मागणी केली. आता कायदेशीर कारवाईचाही विचार करीत असल्याचे ‘डेली स्टार’शी बोलताना येल म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT