dahal dam
dahal dam file photo
ग्लोबल

तालिबान दहशतवादी लोकांना पाण्यासाठी तरसवणार

सकाळ डिजिटल टीम

काबूल-आपले प्राबल्य असलेल्या कंधारमध्ये अनेक महिने भीषण संघर्ष केल्यानंतर तालिबानी दहशतवाद्यांनी (liban terrorists) अफगाणिस्तानतील (afganistan) दुसऱ्या मोठ्या धरणावर ताबा मिळवला आहे. दहशतवादी संघटना आणि अधिकाऱ्यांनी गुरुवारी याची पुष्टी केली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं की, धरण खूप महत्त्वाचे असून अनेक गावांना यामुळे सिंचन आणि पिण्याचे पाणी मिळते. पण आता यावर तालिबानचे नियंत्रण आले आहे. 'लाईव्ह हिंदूस्तान'ने यासंदर्भातील वृत्त दिलंय. (afganistan news taliban terrorists capture dahla dam america)

तालिबानचे प्रवक्ता कारी यूसुफ अहमदीने एफपीला सांगितलं की, आम्ही अरघानदाबमध्ये दाहला धरणावर (dahla dam) ताबा मिळवला आहे. शेजारील जिल्ह्याचे गवर्नर हाजी गुलबुद्दीन यांनीही याची पुष्टी करत म्हटलंय की, धरणावर तालिबानचे नियंत्रण आले आहे. लष्कराने आणखी काही सैन्याची मागणी केली, पण ती पूर्ण झाली नाही. त्यानंतर या धरणावर तालिबानने नियंत्रण मिळवले.

धरणावर ताबा मिळवण्याची ही घटना हेलमंद प्रातात झालेली हिंसा आणि अमेरिकी सैन्याने सैन्य माघारीच्या काही दिवस आधी झाली आहे. कंधार जल विभागाचे प्रमुख तूरयालय माहबूबी यांनी सांगितलं की, नुकतेच तालिबानने दाहला कर्मचाऱ्यांना कामावर न जाण्याची धमकी दिली होती.

मागील महिन्यात तालिबानने शेजारील जिल्ह्याला धरणाशी जोडणाऱ्या पूलाला उडवून दिले होते. या धरणाचे निर्माण ५० वर्षांपूर्वी अमेरिकेने केले होते. कंधारच्या सात जिल्ह्यात या धरणाच्या साहाय्याने सिंचन केले जाते. २०१९ मध्ये एशियन डेव्हलेपमेंट बँकेने यासाठी ३५० मिलियन डॉलरचा फंड मंजूर केला होता. जवळपासच्या जिल्ह्यात मागील सहा महिन्यापासून भीषण लढाई सुरु आहे. दरम्यान, अमेरिकेने सप्टेंबर महिन्यात सैन्य वापस बोलवणार असल्याची घोषणा केली आहे. सैन्य माघारीआधीच तलिबानने आपले रंग दाखवण्यास सुरुवात केल्याने चिंता वाढली आहे. देश पुन्हा तालिबानच्या हाती जातो का, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT