protest sakal
ग्लोबल

अफगाणिस्तानचा पैसा ९/११ हल्ल्यातील बळींच्या कुटुंबाला देण्याला विरोध

अफगाण जनतेचा पैसा इतरांना देण्याचा अमेरिकेला कोणताही अधिकार नाही, असा दावा आंदोलकांनी केला.

सकाळ वृत्तसेवा

काबूल : अफगाणिस्तान सरकारच्या अमेरिकेत असलेल्या संपत्तीपैकी सात अब्ज डॉलरची संपत्ती मुक्त करून त्यापैकी साडे तीन अब्ज डॉलर ९/११ हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना देण्याच्या अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या निर्णयाच्या विरोधात काबूलमध्ये नागरिकांनी जोरदार निदर्शने केली. अफगाण जनतेचा पैसा इतरांना देण्याचा अमेरिकेला कोणताही अधिकार नाही, असा दावा आंदोलकांनी केला.

अफगाणिस्तानची नऊ अब्ज डॉलरची संपत्ती विदेशांमध्ये असून त्यापैकी सात अब्ज डॉलर अमेरिकेतच आहे. तालिबानने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सत्ता काबीज केल्यावर अमेरिकेने ही संपत्ती गोठविली होती.

ज्यो बायडेन यांनी ही संपत्ती मुक्त करत त्यातील निम्मी रक्कम अफगाणिस्तानमध्ये मानवतावादी मदतीसाठी, तर निम्मी रक्कम अल कायदाने ११ सप्टेंबर २००१ ला वर्ल्ड ट्रेड सेंटरवर केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयाला अफगाणिस्तान नागरिकांनी विरोध केला आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात बळी पडलेल्या अफगाण नागरिकांबाबत अमेरिकेने कोणताही विचार केलेला नाही. अमेरिकेत असलेला पैसा अफगाणिस्तान नागरिकांचा आहे, अमेरिकेला त्याचा वापर करण्याचा कोणताही अधिकार नाही, असा दावा निदर्शकांनी केला आहे.

हा पैसा अफगाणिस्तानच्या जनतेला परत देणे आवश्‍यक आहे. मानवतावादी मदतीसाठी तो नाही. बायडेन यांचा निर्णय एकतर्फी आणि आंतरराष्ट्रीय कायद्याला धरून नाही.

- तोरेक फरहादी, अफगाणिस्तानचे माजी अर्थ सल्लागार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT