Afghanistan Sakal
ग्लोबल

अफगाणी नागरिकांना या १३ देशांत मिळणार आसरा

अफगाणिस्तानमधून सुटका केलेल्या आणि जोखमीची भीती असलेल्या अफगाणी नागरिकांना तात्पुरत्या काळासाठी शरण देण्‍यास १३ देशांनी मान्यता दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन - अफगाणिस्तानमधून (Afghanistan) सुटका केलेल्या आणि जोखमीची भीती असलेल्या अफगाणी नागरिकांना (Citizens) तात्पुरत्या काळासाठी शरण (Aslyum) देण्‍यास १३ देशांनी मान्यता (Permission) दिली आहे. अमेरिकेसह १३ देशांनी बाहेर काढलेल्या निर्वासितांना नेण्यासाठी ‘ट्रान्झिट’ ठाणे देशाचा वापर करू देण्यास आणखी काही देशांनी परवानगी दिली आहे. ही माहिती अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी शुक्रवारी दिली.

ते म्हणाले, ‘‘ज्या संभाव्य अफगाणी शरणार्थींच्या पुनर्वसनाची व्यवस्था अमेरिकेत झालेली नाही अशा निर्वासितांना अल्बानिया, कॅनडा, कोलंबिया, कोस्टारिका, चिली, कोसोव्हो, उत्तर मॅसेडोनिया, मेक्सिको, पोलंड, कतार, रवांडा, युक्रेन आणि युगांडा या देशांनी निर्वासितांना आसरा देण्याची तयारी दाखविली आहे. ‘ट्रान्झिट’ देशांमध्ये बहारीन, ब्रिटन, डेन्मार्क, जर्मनी, इटली, कझाकिस्तान, कुवेत, कतार, तुर्कस्तान, संयुक्त अरब अमिरात आणि उझबेकिस्तान यांचा समावेश आहे.’’

अन्य देश मदत करण्याचा विचार करीत आहेत, याचा आम्हाला आनंद वाटत आहे, असे ब्लिंकन म्हणाले. विदेशातील अमेरिकी नागरिकांच्या सुरक्षा व संरक्षणापेक्षा आमच्यासाठी इतर कशालाही महत्त्व नाही. तसेच अन्य सहकारी देश व धोक्यात असलेल्या अफगाणी नागरिकांसाठी आम्ही आमची जबाबदारी पेलण्यास कटिबद्ध आहोत, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT