IMRAN KHAN FRANC24
ग्लोबल

तालिबानी चांगले, त्यांना उगाच बदनाम केलंय - पाकिस्तान

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानने नेहमीच तालिबानचे समर्थन केले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्याचं स्वागत केलं होतं.

इस्लामाबाद - तालिबानींसाठी पाकिस्तानचं प्रेम पुन्हा एकदा उफाळून आलं आहे. अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेल्या गोंधळाच्या परिस्थितीत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी असं वक्तव्य केलं की, आधीचं अफगाण सरकार तालिबानची बदनामी करत होते. आता ते खोटं ठरलं आहे. कारण तालिबानींनी सरकारी कर्मचाऱ्यांना सार्वजनिक माफी जाहीर केली आहे. तसंच मुलींना शिक्षणापासून दूर ठेवलं जाणार नाही अशी घोषणा केलीय.

कुरैशी यांनी माध्यमांशी बोलातना म्हटलं की,"तालिबान मुलींच्या शिक्षणावर बंदी घालेल अशी भीती होती पण असं झालं नाही. तालिबानने सार्वजनिकरित्या माफी जाहीर केली आहे. त्यांनी शाळा आणि व्यवसाय उघडणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच कोणत्याही प्रकारे सूड घेणार नाही आणि आतापर्यंत जे काही केलं आहे ते शांततेनं केलं असून त्याचं स्वागत करायला हवं."

डॉन न्यूजच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री कुरैशी यांनी सांगितलं की, 'पाकिस्तानविरोधात खोटा ट्रेंड सुरु झाला पण तो अयशस्वी ठरला. जगाला माहिती आहे की अफगाणिस्तानमध्ये भ्रष्टाचारी व्यवस्था होती. सध्या जग अफगाणिस्तान प्रकरण सोडवण्यासाठी पाकिस्तानला एक जबाबादर देश समजून संपर्क करत आहे. आम्हाला अफगाणिस्तानात अशी व्यवस्था हवी आहे जी जगाला मान्य असेल.'

पाकिस्तानने नेहमीच तालिबानचे समर्थन केले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्याचं स्वागत केलं. त्यांनी तालिबानचे अफगाणिस्तानात पुनरागमन हे गुलामगिरीच्या बेड्या तोडल्याचं म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT