Kabul Sakal
ग्लोबल

उझबेकिस्तानने अफगाणिस्तानचं जेट विमान पाडलं, ४६ विमानांचं जबरदस्ती लँडिंग

बेकायदेशीररित्या उझबेकिस्तानच्या हवाई हद्दीत (air space) शिरल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

दीनानाथ परब

नवी दिल्ली: मागच्या दोन दिवसात उझबेकिस्तान एअर फोर्सने (Uzbekistan Air force) अफगाणिस्तानच्या ४६ विमानांना (Afghan aircraft) जबरदस्ती लँडिंग करण्यास भाग पाडले आहे. या विमानांमध्ये ५८५ सशस्त्र सैनिक (servicemen) होते. बेकायदेशीररित्या उझबेकिस्तानच्या हवाई हद्दीत (air space) शिरल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या विमानांना उझबेकिस्तानच्या विमानतळांवर उतरवण्यात आले.

अफगाणिस्तानात रविवारी सरकार कोसळलं. तालिबानी दहशतवाद्यांनी राजधानी काबूलवर नियंत्रण मिळवलं. तेव्हापासूनच अफगाणि नागरिक आणि सैनिक देश सोडून जात आहेत. रविवारी अफगाणिस्तानच्या लष्करी जेट विमानाने उझबेकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्यानंतर ते विमान पाडण्यात आलं. उझबेकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये ही माहिती दिली आहे.

"उझबेकिस्तानच्या हवाई सुरक्षा पथकाने अफगाणिस्तानच्या लष्करी विमानांचा बेकायदरित्या प्रवेश करण्याचा प्रयत्न हाणून पाडला" असे रॉयटर्सने संरक्षण दलाचे प्रवक्ते बाहरोम झुलफीकोरोव्ह यांच्या हवाल्याने म्हटले आहे. सीमा ओलांडून आलेल्या ८४ अफगाणि सैनिकांना ताब्यात घेतल्याचं उझबेकिस्तानने रविवारी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी अनिवार्य! न शिकवल्यास मान्यता रद्द होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Gas Shortage: जेजेतील कॅन्टीन सेवेला गॅसटंचाईचा फटका; विद्यार्थी, डॉक्टर, रुग्णांच्या नातेवाइकांना त्रास

सिलिंडरसाठी रांगेत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका, ६६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, कुटुंबियांकडून आर्थिक मदतीची मागणी...

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

Latest Marathi News Live Update : नगर-श्रीगोंदा मार्गांवर तेल वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT