kabul attack. 
ग्लोबल

Afghanistan: काबूल विद्यापीठात दहशतवादी हल्ला; विद्यार्थ्यांसह 25 जणांचा मृत्यू

सकाळन्यूजनेटवर्क

काबूल: काबूल विद्यापीठात आज तीन दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दहा विद्यार्थ्यांसह 25 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर सुरक्षा सैनिकांनी तातडीने विद्यापीठ परिसराला वेढा घातला. अनेक तासांच्या चकमकीनंतर तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दहशतवाद्यांनी आज काबूल विद्यापीठात प्रवेश करत दिसेल त्या विद्यार्थ्यावर गोळीबार करण्यास सुरवात केली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात किमान 25 जणांचा मृत्यू झाला. गोळीबारानंतर काही वेळात या भागात एक स्फोट झाल्याचेही नागरिकांनी सांगितले. या हल्ल्यात आपला कोणताही सहभाग नसल्याचे तालिबानने स्पष्ट केले आहे. 

अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. गेल्या दहा दिवसांत काबूलमधील शिक्षण संस्थेवर दुसऱ्यांदा हल्ला झाला आहे. काही दिवसांपूर्वी एका शिक्षण केंद्रावर झालेल्या हल्ल्यात २४ जणांचा मृत्यू झाला होता. काबूल विद्यापीठामध्ये चार वर्षांपूर्वीही दहशतवादी हल्ला झाला होता.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन वर्षातून १ चित्रपट तरीही कोट्यवधींचा मालक आहे सलमान खान; कुठून होते अभिनेत्याची कमाई, वाचा साइड बिझनेसचं गणित

Railway Rest House: बेड, फ्रिज, आरओ अन्... भारतीय रेल्वेची मोठी भेट; आधुनिक विश्रामगृह सुरू

Kothrud News : कोथरूडमध्ये एकाच वेळी पाणी व वीजपुरवठा खंडित; नागरिकांचा संताप!

'धुरंधर'च्या यशामध्ये खऱ्या रहमान डकैतच्या मयतीचा व्हिडिओ व्हायरल; एन्काउंटरनंतर अशी होती परिस्थिती, मृतदेहाजवळ...

Latest Marathi News Live Update : ३०० लोक रद्द, पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गिकेसाठी शनिवारी कामे

SCROLL FOR NEXT