जलालाबाद (अफगाणिस्तान) - इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी तुरुंगावर हल्ला केल्यानंतर अफगाणिस्तान लष्कराने कारवाईसाठी मोहीम सुरु केली. त्यासाठी हमवी या वाहनातून दाखल झालेले जवान. (एएफपी)
जलालाबाद (अफगाणिस्तान) - इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी तुरुंगावर हल्ला केल्यानंतर अफगाणिस्तान लष्कराने कारवाईसाठी मोहीम सुरु केली. त्यासाठी हमवी या वाहनातून दाखल झालेले जवान. (एएफपी) 
ग्लोबल

अफगाणिस्तान पुन्हा अंधारयुगाकडे, तालिबानची पोलादी पकड

सकाळ वृत्तसेवा

काबूल : तालिबानने अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या पाठबळावरील सरकार उलथून टाकल्यानंतर या देशात अभूतपूर्व गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. अफगाणिस्ताचे अध्यक्ष अश्रफ घनी हेच देश सोडून पळून गेल्यानंतर जीव वाचविण्यासाठी शेकडो नागरिक काबूल विमानतळावर जमा होत विमानाच्या टपावर, पंखांवर आणि चाकांवरही बसल्याचे चित्र दिसत होते. दहशतवाद संपविण्यासाठी गेल्या दोन दशकांपासून ठाण मांडून बसलेल्या अमेरिकेच्या सैन्याची माघारी सुरु झाल्यापासून दोनच महिन्यांत तालिबानने पुन्हा संपूर्ण देश त्यांच्या मुठीत घेतला आहे.

तालिबानी दहशतवाद्यांनी काबूलमधील संसदेच्या इमारतीवर आणि अध्यक्षीय निवासस्थानावर ताबा मिळविला आहे. अमेरिकेने ३१ ऑगस्टपर्यंत सैन्यमाघारी करण्याचे जाहीर केल्यानंतर मे महिन्यापासून तालिबानने देशावर ताबा मिळविण्यास सुरुवात केली. अमेरिकेने संपूर्ण लक्ष काढून घेतल्याने कोणताही अथवा फारसा विरोध न होता तालिबानने एकामागून एक जिल्ह्यांवर वर्चस्व मिळविले. अमेरिकेने आणि इतर नाटो देशांनी प्रशिक्षीत केलेल्या अफगाणिस्तानच्या सैनिकांनी फारसा विलंब न लावता शरणागती पत्करली आणि अनेक जण पळून गेले. तालिबानने ज्या वेगाने देशावर नियंत्रण मिळविले आणि अमेरिकेच्या सैनिकांची अल्पप्रमाणात का होईना उपस्थिती असतानाही काबूलवर नियंत्रण मिळविले, ते पाहता अनेक देशांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे. तालिबानच्या या वर्चस्वामुळे सामान्य नागरिकांमध्ये भयाचे वातावरण असून हजारो जण देशाबाहेर जाण्यासाठी आज काबूल विमानतळावर जमा झाले होते.

विमानतळावर गोळीबार

विमानतळावर अनेक लोक धावपट्टीवर उभ्या असलेल्या अमेरिकेच्या विमानावर चढले होते. विमानात प्रवेश मिळविण्यासाठी ते प्रयत्न करत होते. काही जण विमानाच्या टपावर जाऊन बसले, तर काही जण पंखांना लटकले. काहीही करून देशाबाहेर जायचेच, या उद्देशाने लोक चाकावरही बसले होते. लोकांना नियंत्रणात आणण्यासाठी काबूल विमानतळावरील अमेरिकी सैनिकांना हवेत गोळीबारही करावा लागला. गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे. उड्डाण करण्यासाठी विमान धावपट्टीवरून धावत असतानाही लोक चाकाच्या अगदी जवळून पुढे धावत होते. अखेर सैनिकांनी अश्रुधुराचा वापर करत गर्दी पांगवली. चाकावर लपून बसलेले दोघे जण विमान थोडे वर जाताच खाली पडल्याचे स्थानिक माध्यमांनी सांगितले. अनेक लोक रस्ते मार्गानेही देश सोडून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सध्या सर्व सीमांवर तालिबानचे नियंत्रण आहे.

अंदाज चुकविला

अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर पाश्‍चिमात्य देशांच्या पाठबळावर अफगाणिस्तान सरकार देशात स्थैर्य निर्माण करेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली होती. तालिबानने गावे ताब्यात घेण्यास सुरुवात केली, तेव्हाही त्यांना देश काबीज करण्यासाठी किमान दोन वर्षे लागतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, सर्व अंदाज फोल ठरवत तालिबानने दोनच महिन्यांत देशाची सूत्रे ताब्यात घेतली.

महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता

तालिबानच्या वर्चस्वाखालील तालिबानमध्ये महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे. बहुतेक नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. मात्र, तालिबान्यांनी कोणाच्याही घरात घुसू नये, तोडफोड करू नये, लोकांचे रक्षण करावे, अशा सूचना त्यांना देण्यात आल्याचा दावा तालिबानचा प्रवक्ता सुहेल शाहिन याने केला आहे. पाश्‍चिमात्य देशांतील नागरिकांची घरे, दूतावास असलेल्या भागापासूनही आपण दूर राहणार असल्याचे तालिबानने सांगितले आहे. मात्र, सत्ता चालविणे सोपे जावे आणि इतर देशांकडूनही मान्यता मिळावी, यासाठी त्यांचा हा डाव असल्याचे मत राजकीय विश्‍लेषकांनी व्यक्त केले.

प्रमुख घडामोडी

- हिंसाचार न करण्याचे संयुक्त राष्ट्रांचे तालिबानला आवाहन

- अमेरिकेचा दूतावास बंद, अधिकारी विमानतळाच्या इमारतीत आश्रयाला

- पोर्तुगालच्या दूतावासात काम करणाऱ्या २४३ जणांना बाहेर काढणार

- आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी ऑस्ट्रेलियाने अडीचशे सैनिक आणि विमान पाठविले

- अमेरिकेने आणखी एक हजार सैनिक पाठविले, एकूण कुमक ६०००.

- अफगाणिस्तानची हवाई हद्द बंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: देशभक्तांमध्ये सर्वजण येतात... आरोप करणारे देशद्रोही; उद्धव ठाकरेंचा जोरदार पलटवार!

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

Latest Marathi News Live Update : आप खासदार राघव चढ्ढा दिल्लीत दाखल

SCROLL FOR NEXT