Afghanistan earthquake Death Toll eSakal
ग्लोबल

Afghanistan earthquake : अफगाणिस्तान भूकंपात तब्बल 4,000 लोकांचा बळी; 2,000 हून अधिक घरं उद्ध्वस्त

अफगाणिस्तानमध्ये शनिवारी 6.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता.

Sudesh

अफगाणिस्तानमध्ये शनिवारी झालेल्या भूकंपातील बळींची संख्या वाढली आहे. या भूकंपात आतापर्यंत 4,000 हून अधिक लोकांचा बळी गेल्याची माहिती मिळाली आहे. तसंच यामध्ये 2,000 हून अधिक घरं उद्ध्वस्त झाली असल्याचं अफगाण सरकारने सांगितलं आहे.

अफगाणिस्तान नॅशनल डिझॅस्टर मॅनेजमेंट अथॉरिटीने (ANDMA) ही आकडेवारी जाहीर केली आहे. "आतापर्यंत या दुर्दैवी भूकंपामध्ये 4,000 नागरिकांचा बळी गेला आहे. सुमारे 20 गावांमध्ये जवळपास 1,980 घरं उद्ध्वस्त झाली आहेत." अशी माहिती ANDMAचे प्रवक्ते मुल्लाह सैक यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

शनिवारी (7 ऑक्टोबर) दुपारी अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतामध्ये 6.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. आजूबाजूच्या कित्येक प्रांतांमध्ये याचे धक्के जाणवले होते. या भीषण भूकंपानंतर सरकारने तातडीने बचाव आणि मदतकार्यास सुरुवात केली होती.

सध्या विविध संस्थांच्या एकूण 35 रेस्क्यू टीम्स भूकंपग्रस्त भागात मदत करत आहेत. यात एकूण 1,000 सदस्य असल्याची माहिती मुल्लाह यांनी दिली. अफगाणिस्तानचे कार्यवाहक पंतप्रधान मोहम्मद हसन अखुंद यांनी सोमवारी (9 ऑक्टोबर) भूकंपग्रस्त भागाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

SCROLL FOR NEXT