Help Sakal
ग्लोबल

'एक हात मदतीचा'; भूकंपाच्या पार्श्वभूमीवर भारताची अफगाणिस्तानला मदत

या भूकंपात तेथील सुमारे एक हजार पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

दत्ता लवांडे

काबूल : दोन दिवसांपूर्वी अफगाणिस्तानात भूकंप झाला. या भूकंपात तेथील सुमारे एक हजार पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये अफगाणिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या पुनर्वसनासाठी भारताने अफगाणिस्तानला मदतीचा हात दिला आहे. आज भारताची मदत अफगाणिस्तानला सुपूर्द करण्यात आली आहे.

(Afghanistan Earthquake Update)

या भूकंपात १०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू तर ढिगाऱ्याखाली दबून 1500 लोक जखमी झाले आहेत.अफगाणिस्तानात (Afghanistan) बुधवारी पहाटे आलेल्या 6.1 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अफगाणिस्तान आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे (Earthquake) देशाच्या पूर्वेकडील भागात मोठे नुकसान झाले आहे. तर या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या 1 हजारांवर पोहोचली असून 1500 लोक जखमी झाले आहेत.

या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तालिबान सरकारच्या एका अधिकाऱ्याने आंतरराष्ट्रीय मदत मागितली होती. "जेव्हा अशा प्रकारची मोठी आपत्ती एखाद्या देशावर येते तेव्हा इतर देशांची मदत आवश्यक असते." असं अफगाणिस्तानचे आपत्कालीन सेवा अधिकारी सराफुद्दीन मुस्लिम यांनी म्हटलं होतं. त्यानंतर भारताने एक हात मदतीचा देत अफगाणिस्तानकडे मदत सुपूर्द केली आहे.

दरम्यान मागच्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानात प्रचंड महागाई वाढली होती त्यामुळे तेथील नागरिक हैराण होते. काही नागरिकांवर १० ते १५ दिवसांपूर्वीच्या शिळ्या भाकरी खाव्या लागत होत्या. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंचे भावही गगनाला भिडले होते. त्यानंतर भूकंपाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे अफगाणिस्तानला सध्या मदतीची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT