Kabul Blast 
ग्लोबल

102 व्या स्वातंत्र्य दिनाच्या रॅलीत तालिबानींचा गोळीबार; अनेकांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

अफगाणिस्तानमधील असदाबाद शहरात देशाच्या स्वातंत्र्यदिना निमित्त सुरु असलेल्या तालिबानींच्या रॅलीमध्ये बेछूट गोळीबार करण्यात आला.

काबूल - अफगाणिस्तानमधील असदाबाद शहरात देशाच्या स्वातंत्र्यदिना निमित्त सुरु असलेल्या तालिबानींच्या रॅलीमध्ये बेछूट गोळीबार करण्यात आला. यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. अफगाणिस्तानमध्ये अजुनही रक्तपात सुरु आहे.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, असदाबादमध्ये अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्यदिना निमित्त काही लोक रॅली काढत होते. यावेळी देशाचा झेंडा फडकावणाऱ्या काही लोकांवर तालिबानींनी गोळीबार केला. यानंतर चेंगराचेंगरीची घटना घडली. यामध्ये किती लोकांचा जीव गेला हे समोर आलेलं नाही. तसंच चेंगराचेंगरीत मृत्यू झाला की गोळीबारात याचीही माहिती समजू शकलेली नाही.

तालिबानने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरवर्षी 19 ऑगस्टला अफगाणिस्तानमध्ये स्वांतंत्र्य दिन साजरा केला जातो. याआधी काबूल विमानतळावर महिला आणि मुलांवर तालिबानींकडून गोळीबार करण्यात आला होता. विमानतळावरून गर्दी कमी करण्यासाठी आणि लोकांना मागे हटवण्यासाठी गोळीबार करण्यात आला होता.

काबुलसह पूर्वेकडील शहरांमध्ये आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला तालिबानिंविरोधातील नेत्यांकडून पाठिंबा देण्यात आला आहे. दरम्यान, तालिबानच्या भीतीने देशातून रविवापासून 8 हजार जणांनी देश सोडला असल्याचं सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT