Afghanistan
Afghanistan esakal
ग्लोबल

काबुलमध्ये रुग्णालयासमोर आत्मघाती हल्ला; 15 जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी असलेल्या काबूलमध्ये (Kabul) भीषण स्फोट झालाय.

अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी असलेल्या काबूलमध्ये (Kabul) भीषण स्फोट झालाय. या स्फोटात 15 जणांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात लोक जखमीही झाले आहेत. सरदार मोहम्मद दाऊद खान रुग्णालयासमोर (Sardar Mohammad Daud Khan Hospital) झालेला स्फोट आत्मघातकी हल्ला असल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान, घटनास्थळावरून गोळीबाराचा आवाजही ऐकू आल्याचं घटनास्थळी उपस्थित असलेल्या सूत्रांनी सांगितलंय. मात्र, स्फोटाचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही.

दरम्यान, तालिबानकडून (Taliban) राजधानीत झालेल्या स्फोटाबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून काबूलमध्ये सातत्यानं स्फोट होत आहेत. यातील बहुतांश बॉम्बस्फोट इस्लामिक स्टेटशी (IS किंवा ISIS) संलग्न असलेल्या संघटना करत आहेत. मात्र, लवकरच इस्लामिक स्टेटवर मात करून देशात शांतता प्रस्थापित करू, असं तालिबाननं म्हटलंय. आतापर्यंत दहशतवादी संघटनेनं अफगाणिस्तानच्या विविध भागात स्फोट घडवून आणले आहेत.

काबूलमध्ये सर्वात धोकादायक स्फोट ऑगस्टमध्ये विमानतळावर घडला होता. अफगाणिस्तानवर तालिबाननं ताबा मिळवल्यानंतर देश सोडू पाहणारे लोक मोठ्या संख्येनं काबूल विमानतळावर जमले होते. 26 ऑगस्ट रोजी झालेल्या या स्फोटात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर 150 हून अधिक लोक जखमी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramesh Chennithala : मतदारांचा कल ‘इंडिया’ आघाडीकडे

Loksabha Election 2024 : मोदी, ठाकरे, गांधी, पवार यांचीच हवा

Election Commission : निवडणूक आयोगाकडून तंत्रज्ञानस्नेही कारभाराला प्राधान्य

Devendra Fadnavis : कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग नगरपर्यंत नेणार

Success Story : पोरीची जिद्दच लय मोठी! अपघातात हात गमावला तरी अनामता डगमगली नाही, बोर्डात मिळवले ९२ टक्के मार्क्स

SCROLL FOR NEXT