ग्लोबल

अमेरिकन सैनिकाकडे दिलं तेव्हापासून चिमुकला बेपत्ता; शोध सुरु

सकाळ डिजिटल टीम

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने ताबा मिळवल्यानंतर मोठा गोंधळ माजला होता. तेव्हा चिमुकल्याला विमानतळावर अमेरिकन सैनिकाकडे सोपवताना शेवटचं पाहण्यात आलं होतं.

अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर मोठ्या प्रमाणावर तिथल्या नागरिकांनी स्थलांतर केले. जिवाच्या भीतीने नागरिकांनी विमानाला लटकून प्रवास केला. यात काहींचा मृत्यूसुद्धा झाला होता. अफगाणिस्तानमध्ये माजलेल्या या अराजक परिस्थितीचे काही फोटो व्हायरल झाले होते. यामध्ये अफगाणिस्तानच्या सीमेवरून अमेरिकन सैनिकांच्या हातात देत असलेल्या एका चिमुकल्याच्या फोटोचा समावेश होता. अवघ्या दोन महिन्याच्या त्या मुलाचा आता शोध सुरु आहे. मिर्जा अली अहमदी आणि त्यांची पत्नी सुराया हे काबुल विमानतळावर पोहोचले होते. तेव्हा मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी दोन महिन्यांचा पोटचा गोळा अमेरिकन सैनिकांकडे सोपवला होता. मात्र आता त्याची कोणतीच माहिती मिळत नसल्याचे समोर आले आहे.

मुलाच्या आई वडिलांचे म्हणणे आहे की, १९ ऑगस्टला ते मुलांसह काबुल विमातळाबाहेर आले होते. तिथं बरीच गर्दी होती. मुलाला काही होऊ नये, तो गर्दीत जखमी होऊ नये यासाठी त्याला अमेरिकन सैनिकांकडे सोपवलं होतं. ५ मीटर उंच भिंतीवर असलेल्या एका अमेरिकन सैनिकाने मदत हवीय का असं विचारलं होतं. तेव्हा २ महिन्यांच्या सोहेलला मिर्जा यांनी त्यांच्याकडे दिलं होतं. काही वेळाने आत जाऊन आपण सोहेलला घेऊ असं त्यांना वाटलं होतं.

मिर्जा अली जेव्हा विमानतळाच्या आत गेले तेव्हा सोहेल कुठेच दिसला नाही. मिर्जा अली यांनी प्रत्येक अधिकाऱ्याकडे याबाबत चौकशी केली. तेव्हा एका लष्करी कमांडरने सांगितलं की, विमानतळ एका मुलासाठी खूपच धोकादायक आहे आणि त्याला विशेष ठिकाणी नेण्यात आलं असावं. मात्र तिथेही कोणीच नव्हतं.

चिमुकल्याचा त्यानंतर तीन दिवस शोध घेतला गेला. तेव्हा अमेरिकन कमांडरसोबत विमानतळाचा प्रत्येक कोपरा पाहिला. कमांडरचे नाव माहिती झालं नाही. कारण मला इंग्रंजी येत नव्हतं आणि कमांडरशी बोलताना इतरांची मदत घ्यावी लागली असं मिर्जा अलीने म्हटल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.

तीन दिवस शोध घेतल्यानंतर मिर्जा अली पत्नी आणि इतर मुलांसह कतारला गेले आणि तिथून जर्मनीला गेले. शेवटी अमेरिकेतसुद्धा मिर्जा अली पोहोचले. आता कुटुंबिया टेक्सासच्या फोर्ट ब्लिसमध्ये इतर अफगाणि शरणार्थींसोबत राहत असून अमेरिकेत स्थायिक होण्याची वाट पाहत आहेत. इथे त्यांचे कोणीही नातेवाईक नाहीत.

मिर्जा अली आता कोणालाही भेटले तर त्याला सोहेलबाबत सांगता. प्रत्येकजण मदत करू म्हणतात पण ते फक्त आश्वासनच देतायत अशा हतबल भावना मिर्जा अली यांनी व्यक्त केल्या. दरम्यान, अमेरिकन अधिकाऱ्याने म्हटलं की, या प्रकरणी सर्व तपास संस्थांना कळवण्यात आले आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानने ताबा मिळवल्यानंतर मोठा गोंधळ माजला होता. तेव्हा चिमुकल्याला विमानतळावर अमेरिकन सैनिकाकडे सोपवताना शेवटचं पाहण्यात आलं होतं. त्यानंतर मात्र दुर्दैवाने त्याची कोणतीही माहिती नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT