China - Afganistan  sakal
ग्लोबल

अफगाणिस्तान जिंकलं, पण पंजशीरमध्ये तालिबानचं काय होणार?

भारताचा पाठिंबा असलेल्या नॉर्दन अलायन्सनेच तालिबानला संपूर्ण अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवण्यापासून रोखलं होतं.

दीनानाथ परब

काबूल: तालिबानने (taliban) संपूर्ण अफगाणिस्तानवर (Afganistan) नियंत्रण मिळवलं असलं, तरी त्यांना अजून राजधानी काबुलपासून (kabul) ईशान्येला १०० किमी अंतरावर असलेला पंजशीर (panjshir) प्रांत जिंकता आलेला नाही. तालिबानच्या राजवटीपासून अजूनही हा प्रांत मुक्त आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत अमेरिका अफगाणिस्तान सोडणार हे स्पष्ट झाल्यानंतर तालिबानने एक-एक करुन अफगाणिस्तानचे सर्व प्रांत सहज ताब्यात घेतले. पण पंजशीर मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागेल किंवा तिथे त्यांचा पराभव सुद्धा होऊ शकतो. परकीयांना किंवा अफगाणिस्तानातल्या तालिबान सारख्या गटांना आतापर्यंतच्या युद्धामध्ये पंजशीर जिंकता आलेले नाही. हा इतिहास आहे. हा प्रांत स्वतंत्रच राहिला आहे.

पंजशीरची भौगोलिक रचना कशी आहे ?

पंजशीर एक निर्सगरम्य खोरं आहे. अफगाणिस्तानच्या ३४ प्रांतापैकी हा एक प्रांत आहे. पंजशीर सात जिल्ह्यांमध्ये विखुरलेले असून इथेत ५१२ गावं आहेत. २०२१ च्या जनगणनेनुसार, पंजशीरची लोकसंख्या १ लाख ७३ हजार आहे. बाझारक ही या प्रांताची राजधानी आहे.

पंजशीरमध्ये अमरुल्ला सालेह तालिबान विरोधी आघाडी उभी करणार?

पंजशीरमधून अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी अफगाणिस्तानच्या संविधानानुसार स्वत:ला काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष म्हणून जाहीर केले. तालिबान विरोधात आघाडी उभी करण्याचा त्यांचा विचार आहे.

कट्टर तालिबान विरोधक अहमद शाह मसूद

अमरुल्ला सालेह यांचा अहमद मसूदसोबतचा फोटो सोशल मीडियावरुन समोर आला आहे. अहमद मसूद हा दिवंगत नेते अहमद शाह मसूद यांचा मुलगा आहे. अहमद शाह मसूद हे कट्टर तालिबान विरोधक म्हणून ओळखले जायचे. तालिबान विरोधात लढण्याची तयारी असलेले अफगाण सैनिक पंजशीरमध्ये दाखल होत असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. ९/११ हल्ल्याआधी २००१ मध्येच अलकायदा आणि तालिबानने कट रचून अहमद शाह मसूद यांची हत्या घडवून आणली. अहमद शाह मसूद यांचा पंजशीरमध्ये दबदबा होता. त्यांच्या शब्दाला मान होता.

पंजशीर किल्ला

१९७०-८० च्या दशकात सोविएत फौजांनी अफगाणिस्तानवर आक्रमण केले होते. पण त्यांना पंजशीर मिळवता आले नाही. पुन्हा एकदा पंजशीर तालिबान विरोधाचे मुख्य केंद्र बनू शकते. नॉर्दन अलायन्ससाठी पुन्हा एकदा स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची, संघटना मजबूत करण्याची हीच संधी आहे. नॉर्दन अलायन्सचा वेगळा झेंडा असून पंजशीरमध्ये तो डौलाने फडकत आहे. नॉर्दन अलायन्स एक लष्करी आघाडी आहे. तालिबान सारखेच इथे सुद्धा योद्धे आहेत. तालिबान विरोधात लढण्यासाठी हा अलायन्स आकाराला आला. इराण, भारत, तजाकिस्तान, उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांकडून नॉर्दन अलायन्सला मदत आणि बळ मिळाले. १९९६ ते २००१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता होती. त्यावेळी नॉर्दन अलायन्सनेच त्यांना संपूर्ण अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवण्यापासून रोखले होते.

पूर्वीच्या आणि आताच्या तालिबानमध्ये फरक काय?

पण सध्या तालिबानने ज्या वेगाने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवलय, ते लक्षात घेता पंजशीरचा शेवटचा किल्ला शाबूत ठेवणं सालेह, मसूद आणि त्यांच्या पाठिराख्यांसाठी इतकं सोप नाहीय. वस्तुस्थिती अशी आहे की, पंजशीरला चारही बाजुंनी तालिबानचे वर्चस्व असलेल्या भागांनी घेरलेलं आहे. आता तालिबानकडे पहिल्यापेक्षा जास्त क्षमता आहे. त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र आहेत. तालिबानी बंडखोरांकडे असलेल्या शस्त्रास्त्रांमध्ये मोठा फरक पडला आहे. आता फक्त त्यांच्या हातात बंदुका नाहीयत, तर दुसऱ्या देशासारख सैन्य त्यांच्याकडे आहे.

बंदुका, रायफल, सैनिकी वाहने, रॉकेट लाँचर यामुळेच तालिबानने अत्यंत वेगाने अनेक प्रदेश ताब्यात घेतले. अपेक्षेपेक्षा खूप लवकर काबूलमध्ये धडक मारली. पंजशीरमध्ये तालिबान विरोधात लढाई झालीच, तर त्यासाठी पंजशीरमधल्या योद्ध्यांना अत्याधुनिक शस्त्रांसह परकीय मदत लागेल. कारण आताची लढाई तितकी सोपी नसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT