G20 Summit AU eSakal
ग्लोबल

G20 Summit : आता 'जी-20' नाही, तर 'जी-21'.. आफ्रिकन युनियनला मिळालं स्थायी सदस्यत्व; पंतप्रधान मोदींची घोषणा!

AU in G20 : आफ्रिकन महासंघाला G20 राष्ट्रांमध्ये स्थायी सदस्यत्व देण्यात आलं असल्याचं पंतप्रधान मोदींनी जाहीर केलं.

Sudesh

दिल्लीमध्ये सध्या जी-20 परिषदेची मोठी बैठक सुरू आहे. या बैठकीची सुरुवात करतानाच एक मोठी घोषणा करण्यात आली. आफ्रिकन महासंघाला G20 राष्ट्रांमध्ये स्थायी सदस्यत्व देण्यात आलं असल्याचं पंतप्रधान मोदींनी जाहीर केलं. यानंतर आफ्रिकन संघाचे अध्यक्ष अझाली असोउमानी यांचं सर्वांनी स्वागत केलं.

आफ्रिकन महासंघाला जी-20 देशांचं स्थायी सदस्यत्व मिळावं यासाठी पंतप्रधानांनी सर्व सदस्य देशांसमोर प्रस्ताव ठेवला होता. याला सर्वांची मान्यता मिळाल्यानंतर PM मोदींनी आपल्याजवळील 'गॅवल' तीन वेळा वाजवून आफ्रिकन संघाच्या अध्यक्षांना पुढे आमंत्रित केले.

पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर परराष्ट्र मंंत्री जयशंकर यांनी आफ्रिकन युनियनच्या अध्यक्षांना आपल्या नवीन स्थानापर्यंत पोहोचवले. याठिकाणी पंतप्रधान मोदींनी मिठी मारुन त्यांचं स्वागत आणि अभिनंदन केलं. टाळ्यांच्या कडकडाटात अझाली असोउमानी हे जी-20 टेबलवरील आपल्या जागेवर स्थानापन्न झाले.

आफ्रिकन युनियन का महत्त्वाची?

आफ्रिकन महासंघामध्ये एकूण 55 देशांचा सहभाग आहे. यांची एकूण लोकसंख्या ही 1.3 अब्ज एवढी आहे. ही संख्या 2050 सालापर्यंत दुप्पट होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या समूहाला जी-20चं स्थायी सदस्यत्व देण्यात यावं अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून होत होती. पंतप्रधान मोदींच्या पुढाकाराने आता ही मागणी पूर्ण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT