PM Narendra Modi esakal
ग्लोबल

PM Narendra Modi : UAE नंतर आणखी एका मुस्लिम देशात उभं राहणार भव्य मंदिर; सर्व औपचारिकता झाल्या पूर्ण

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी यूएईच्या अबूधाबी येथे भव्य मंदिराचं उद्घाटन केलं. बोचसनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (बीएपीएस) मंदिराच्या उद्घाटनानंतर आणखी एक मुस्लिम देशात मंदिर बनत आहे. त्या देशाचं नाव आहे बहरीन.

संतोष कानडे

नवी दिल्लीः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी यूएईच्या अबूधाबी येथे भव्य मंदिराचं उद्घाटन केलं. बोचसनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (बीएपीएस) मंदिराच्या उद्घाटनानंतर आणखी एक मुस्लिम देशात मंदिर बनत आहे. त्या देशाचं नाव आहे बहरीन.

बहरीन येथेही बीएपीएस मंदिर उभारणार आहे. त्यासाठी जमीन अधिग्रहण झालेलं असून मंदिर उभारण्यासाठीच्या सगळ्या औपचारिकता पूर्ण झालेल्या आहेत. त्यातच लवकरच मंदिर निर्माणकार्य सुरु होणार आहे.

बहरीन येथे उभारण्यात येणारं मंदिर अबूधाबी येथील मंदिराप्रमाणेच भव्य असेल. या मंदिराचं निर्माण बोचसनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेच्या वतीने होणार आहे. अबूधाबी यथील मंदिराचा खर्च ७०० कोटी इतका आहे. बहरीन इथल्या मंदिरासाठीही भरपूर खर्च होणार आहे. बीएपीएसच्या प्रतिनिधी मंडळाने बहरीनचे क्राऊन प्रिन्स सलमान बिन हमाद अल खलिफा यांची भेट घेतली आहे.

कसं आहे अबूधाबीचं मंदिर?

UAE सरकारने अबुधाबी-दुबई महामार्गावरील अबु मुरेखा भागात दिलेल्या २७ एकर जागेवर मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. मंदिराची रचना अत्यंत सुबक करण्यात आली आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूंना नदीच्या घाटासारखी बांधणी करण्यात आली असून नदीच्या प्रवाहाप्रमाणे पाणीही सोडण्यात आले आहे. हे पाणी गंगा आणि यमुना नदीतून आणण्यात आले आहे.

या घाटावर बसल्यावर लोकांना वाराणसीप्रमाणे वाटावे, असा उद्देश आहे. गंगा-यमुनेच्या संगमासारखे वातावरण निर्माण करण्यात आले असून दोन्ही बाजूंच्या पाण्याचा प्रवाह जिथे एकत्र येतो, तिथे लेझर किरण सोडून सरस्वती नदीचे अस्तित्वही भासविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT