Taliban-Afghanistan sakal
ग्लोबल

पंजशीर सोडून पळाले तालिबान विरोधी गटाचे नेते मसूद आणि सालेह

पंजशीरवर पुर्णपणे ताबा मिळवल्याचा दावा तालिबानने केला आहे.

सुधीर काकडे

अफगाणिस्तानमधील (Afghanistan) पंजशीर प्रांत मिळवण्यासाठी तालिबानचा (Taliban) मोठा संघर्ष सुरु आहे. तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर देखील त्यांना पंजशीर प्रांत मिळवता आला नव्हता. काबूलच्या उत्तरेकडे असलेल्या या भागात तालिबान्यांना पंजशीर मिळवणे अत्यंत कठीण जात होते. मात्र आता पंजशीरवर पुर्णपणे ताबा मिळवल्याचा दावा तालिबान्यांनी केला आहे. पंजशीरमध्ये प्रवेश करताच रेझिस्टन्स फोर्सचा नेता अहमद मसूद (Ahmad Massoud) आणि नॉर्दन अलायन्सचा नेता अमरुल्लाह सालेह (Amrullah Saleh) यांनी पंजशीर सोडल्याचे समजते आहे.

पंजशीरवर ताबा मिळवताच नॉर्दन अलायन्सचे नेतृत्व करणार अहमद मसूद आणि अफगाणिस्तानच्या कोसळलेल्या सरकारमधील उपराष्ट्रपती असरुल्लाह सालेह यांनी पंजशीर सोडून थेट ताजिकिस्तान गाठले असल्याचा दावा तालिबानच्या प्रवक्त्याने केला आहे. दरम्यान अहमद मसूदने ट्विटरच्या माध्यमातू आपण सुरक्षित असल्याचे सांगितले होते. त्यावर, पंजशीरमध्ये इंटरनेट नाही, तर मसूदने ट्विट कसे केले? असा प्रश्न उपस्थित करत मसूद पंजशीर सोडून पळाला असल्याचे तालिबानच्या प्रवक्त्यांनी सांगितले असल्याचे एनडीटीव्हीच्या वृत्तामधून समोर आले आहे.

पंजशीरमध्ये सुरु असलेल्या संघर्षाबद्दल तालिबान आणि नॉर्दन अलायन्सकडून वेगवेळे दावे प्रतिदावे केले जात असतानाच, तालिबान्यांना या भागात लढण्यासाठी पाकिस्तानकडून मदत होत असल्याचा दावा रेझिस्टन्स फोर्सचा नेता अहमद मसूद यांनी केला होता. पंजशीर प्रांत हा दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश असून या ठिकाणी रेझिस्टन्स फोर्सच्या सैनिकांशी लढणे तालिबान्यांना कठीण गेले आहे. गेल्या काही दिवसांत पंजशीरच्या या संघर्षात हजार पेक्षा जास्त तालिबान्यांना ठार केल्याचा दावा नॉर्दन अलायन्सकडून करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : डेटिंग ॲप वर मुलीचे बनावट प्रोफाइल तयार करून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

SCROLL FOR NEXT