Crime News 
ग्लोबल

Artificial Intelligence : बापरे! अपहरणासाठी झाला AI चा दुरुपयोग; आवाजाचे क्लोनींग करून...

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स हे अभ्यासाचे आधुनिक क्षेत्र निर्माण झाले आहे. यामध्ये सांख्यिकी, संज्ञानात्मक विज्ञान आणि संकलन आणि माहिती विज्ञान यांसारख्या विविध विभागांमधल्या वैज्ञानिक पद्धती, प्रक्रिया आणि तंत्रांचा वापर केला जातो. मात्र याचा आता दुरुपयोगही सुरू झाल्याचं समोर आलं असून अपहरणासाठी याचा वापर केल्याचं सांगण्यात येत आहे.

एका आईने म्हटले की, अपहरणाच्या प्रयत्नात फसवणूक करणाऱ्यांनी वापरलेल्या आपल्या मुलीच्या एआय व्हॉइस क्लोनमुळे आपल्या मुलीचं अपहरण झाल्याची खात्री पटली होती. जेनिफर डिस्टेफानो असं या आईचं नाव असून त्या अॅरिझोना येथील आहेत. जेनिफर यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला होता. त्यात त्यांना आपली १५ वर्षांची मुलगी ब्री रडत असल्याचे ऐकायला आलं.

फोनवर एका पुरुषाने अपहरानाची धमकी देण्याआधी, मुलीचा आवाज आला. त्यात मुलगी म्हणते आई मी फसले. त्यानंतर फोनवर एक माणूस म्हणतो, 'ऐक, तुझी मुलगी माझ्याकडे आहे. जेनिफर यांनी ही माहिती स्थानिक न्यूज शोला दिली.

What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

पुढे अपहरणकर्त्याने मुलीच्या आईला सांगितले की, "तू पोलिसांना फोन कर किंवा कोणालाही सांगा, मी तिला ड्रग्जने भरलेली बॅग देऊन मेक्सिकोमध्ये सोडणार आहे. त्याचवेळी 'आई, मला मदत कर, प्लीज मला मदत करा' असे म्हणत रडणाऱ्या आपल्या मुलीचा आवाज आल्याचं जेनिफर यांनी सांगितलं. तसेच हा आवाज १०० टक्के आपल्या मुलीचाच होता, असही त्या म्हणाल्या. त्यावेळी मला प्रश्नही पडला नाही, की हा आवाज दुसऱ्या कोणाचा असेल. त्यामुळेच या घटनेने मला धक्का बसल्याचं जेनिफर यांनी म्हटलं.

अपहरणकर्त्याने मुलीची सुटका करण्यासाठी १० लाख डॉलरची मागणी केली होता. त्यानंतर त्याने हा आकडा ५० हजार डॉलरपर्यंत खाली आणला. मात्र एका मैत्रिणीने तिच्या पतीला फोन करून ती सुरक्षित असल्याची खात्री दिल्यानंतर आपली मुलगी सुरक्षित असल्याचे जेनिफर यांना समजले.

पोलिस अजूनही अपहरणकर्त्याचा तपास करत आहेत. या प्रकरणात अपहरकर्त्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स व्हॉईस क्लोन तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे दिसून आले आहे. AI अलीकडच्या काळात लोकांच्या आवाजाची हुबेहुब नक्कल करण्यात अधिक सक्षम झाले आहे.

इंटरनेटवर एआय टूल विनामूल्य उपलब्ध असल्याने याचा वापर करणे तुलनेने सोपे आहे. या तंत्रज्ञानाचा गुन्हेगार किंवा डीपफेक व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करणारे लोक गैरवापर करू शकतात, अशी भीती ही व्यक्त केली जात आहे. एका व्हॉईस क्लोन स्टार्टअपने इशारा दिला की हे साधन "चुकीच्या हातात पडल्यास ते धोकादायक ठरू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT