ग्लोबल

एक चॉकलेट, ९-१० तास पायी चालत विमानतळावर पोहोचले, Air India च्या अधिकाऱ्यांचे आभार

सकाळ डिजिटल टीम

युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या २१९ भारतीयांना घेऊन एअर इंडियाचं पहिलं विमान काल भारतात दाखल झाले. या विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे संघर्ष करत रोमियातील पिक अप पॉईंटपर्यंत पोहचले, विद्यार्थ्यांची अवस्था काय होती याबाबत एअर इंडियाच्या कॅबिन क्रू इन चार्ज रजनी पॉल यांनी एएनआयला माहिती दिली. '' युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलांना त्यांच्या पालकांपर्यंत सुखरूप पोहचवावे अशी आमची इच्छा होती. आम्हाला ही संधी मिळाली याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो.'' अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या २१९ भारतीयांना घेऊन एअर इंडियाचं विमान मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल रात्री दाखल झाले होते. दुपारी रोमानियाची राजधानी बुचारेस्ट इथून या विमानाने उड्डाण केलं होतं. हे विमान भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचेल असं सांगण्यात येत होतं. पण ते रात्री ८ वाजेपर्यंतच मुंबईत दाखल झालं आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री पियूष गोयल हे या भारतीय नागरिकांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत बातचित केली होती.

दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेली मुलं खूप त्रास सहन करून पिक अप पाईंटवर पोहचले होते. याबाबत रजनी पॉल यांनी काही मुलांसोबत एअरपोर्टवर बातचीत केली होती, त्याबाबत त्यांनी सांगितले की, ''काही जण ९-१० किलोमीटर आपले सामान घेऊन पायी चालत पिक -अप पॉईंटवर आले होते. काही जणांना एअरपोर्टवर फक्त एक चॉकलेट खाण्यासाठी मिळाले होते.''

२१९ भारतीय नागरिकांसह रोमानियाहून विमान मुंबईला रवाना झाले आहे. याचे छायाचित्र.

युक्रेनमधील विद्यार्थ्यांच्या स्थितीबाबत सांगताना पॉल या भावून झाल्या होत्या, त्या म्हणाल्या की, ''या मुलांचे पालक त्यांच्यासाठी फक्त प्रार्थना करत होते. व्हिडिओ कॉलवर पालक मुलांना सांगत होते की, कृपया घरी सुखरूप परत या, आम्ही तुमची वाट पाहात आहोत.''

''आपल्या देशाने, मंत्रालायाने आणि एअर इंडियाने युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना परत भारतात आणण्याचे हे काम केले आहे त्याचे कौतुक करावे तितके कमी आहे.'' अशी भावना देखील पॉल यांनी यावेळी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: आमदार टिंगरेंनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर अजितदादांचा पुणे पोलीस आयुक्तांना फोन; काय झाली चर्चा?

HSC Result: बारावीत सर्व विषयात १०० टक्के गुण मिळवून तनिषानं घडवला इतिहास! असा केला अभ्यास

Arjun Tendulkar: सचिनचा मुलगा नरसोबा वाडीत काय करतोय ? अर्जुन पोहचला दत्ताच्या चरणी

BSE Market Cap: भारतीय शेअर बाजाराने रचला इतिहास; बीएसईवर कंपन्यांचे मार्केट कॅप प्रथमच 5 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे

Pune Accident: आरोपी अल्पवयीन तरुणाने त्या रात्री पार्टीसाठी किती पैसे खर्च केले? धक्कादायक आकडा समोर

SCROLL FOR NEXT