air india air india
ग्लोबल

मिशन AIRLIFT, दोन विमानं सज्ज ठेवण्याचे एअर इंडियाला आदेश

इमर्जन्सी ऑपरेशन्ससाठी एअर इंडियाने आपल्या क्रू सदस्यांना तयार केले आहे.

दीनानाथ परब

काबुल: मागच्या काही दिवसांपासून एक-एक प्रांत काबीज करणाऱ्या तालिबानने (Taliban) अखेर काबुल (Kabul) वर नियंत्रण मिळवलं आहे. राजधानी काबुलच्या राष्ट्रपती भवनातून तालिबान कुठल्याही क्षण सत्तांतराची घोषणा करण्याची शक्यता आहे. अफगाणि सैन्याने (afgan army) सपशेल शरणागती (surrender) पत्करल्यामुळे अपेक्षेपेक्षाही अधिक वेगाने तालिबानने काबुलवर वर्चस्व मिळवलं आहे. तालिबान काबुलमध्ये दाखलं झालं आणि अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घानी यांनी देश सोडला. तेव्हापासून तिथे गोंधळाची स्थिती निर्माण झालीय.

मूळ अफगाणि आणि तिथे वास्तव्याला असलेल्या परदेशी नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि दहशतीचं वातावरण आहे. कारण त्यांना तालिबानच्या जुलमी राजवटीची कल्पना आहे. सत्ता असलेल्या अन्य प्रातांमध्ये तालिबानकडून स्त्रियांवर जुलूम, अत्याचार सुरु आहेत. त्यामुळे अफगाणी आणि परदेशी नागरिकांनी अफगाणिस्तान सोडण्यासाठी काबुल विमानतळावर एकच गर्दी केली आहे. तिथे गोंधळाची स्थिी आहे. सर्वच देशांनी आपल्या नागरिकांनी मायदेशी सुखरुप आणण्यासाठी लष्करी आणि प्रवासी विमाने पाठवली आहेत. काल एअर इंडियाचे २४३ विमान १२९ प्रवाशांना घेऊन मायदेशी दाखल झाले.

काबुलमधून आणखी नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने एअर इंडियाला दोन विमाने सज्ज ठेवण्यास सांगितली आहेत. सूत्रांनी ही माहिती दिली. काबुल ते नवी दिल्ली इमर्जन्सी ऑपरेशन्ससाठी एअर इंडियाने आपल्या क्रू सदस्यांना तयार केले आहे.

आज रात्री ८.३० वाजता एअर इंडियाचे विमान काबूलला रवाना होणार होते. पण या विमानाची वेळ बदलण्यात आली आहे. आता हे विमान दुपारी १२.३० वाजता रवाना होणार आहे. काबुलच्या हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोळीबार झाल्यामुळे प्रवासी विमानांची उड्डाणे बंद करण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT