Aircraft 
ग्लोबल

Aircraft Missing: उपराष्ट्रपतींसह 9 जणांना घेऊन जाणाऱ्या या देशाचे एअरक्राफ्ट बेपत्ता; शोध मोहीम सुरु

Malawi Vice Presiden missing: tएअरक्राफ्टमधील उपराष्ट्रपती सौलोस क्लॉस चिलिमा (Saulos Klaus Chilima) यांच्यासह ९ जण बेपत्ता आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- इराणच्या अध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघाताची घटना ताजी असतानाच दक्षिणपूर्ण आफ्रिकेतील देश मलावी (Malawi) मध्ये उपराष्ट्रपतींचे एअरक्राफ्ट बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. मलावीच्या राष्ट्रपती ऑफिसने यासंदर्भातील माहिती दिली आहे. एअरक्राफ्टमधील उपराष्ट्रपती सौलोस क्लॉस चिलिमा (Saulos Klaus Chilima) यांच्यासह ९ जण बेपत्ता आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रपती ऑफिस आणि कॅबिनेटने यासंदर्भातील माहिती देताना सांगितलं की, 'एअरक्राफ्ट रडारवरुन गायब झाले होते. त्यानंतर विमान उड्डाण अधिकाऱ्यांकडून विमानाशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. पण, यात अद्याप यश आलेलं नाही. बचावपथक शोध घेण्यासाठी पाठवण्यात आलं आहे.'

माहितीनुसार, ५१ वर्षीय चिलिमा मलावी लष्कराच्या एअरक्राफ्टमध्ये होते. स्थानिक वेळेनुसार सकाळी ९.१७ च्या सुमारास राजधानी लिलोंग्वे येथून एअरक्राफ्टने उड्डाण केले होते. भारतीय वेळेनुसार १२ वाजून ४५ मिनिटाला ही घटना घडली. सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे.

चिलिम यांच्यावर २०२२ मध्ये एका ब्रिटिश-मलावी उद्योगपतीकडून पैसे घेतल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. शिवाय त्यांचे अधिकार काढून घेण्यात आले होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. दरम्यान, चिलिमा यांच्या एअरक्राफ्टबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: जनतेच्या पैशांवर 'अमेरिका वारी', नवी मुंबईच्या महापौरांचा दौरा वादाच्या भोवऱ्यात

Maharashtra Dams : सर्वाधिक धरणे, तरीही पाणी समस्या का? केंद्रीय जलशक्तीमंत्र्यांचा सवाल

Maharashtra Kesari : कुंडलचे मैदाना हिंदकेसरी गोलियाने मारले, ४ महाराष्ट्र केसरी पराभूत; महिला कुस्तीतही उत्तर भारतियांचा डंका

Aurangabad Crime: ‘इन्स्टाग्रामवर फेमस होण्यासाठी व्हिडिओ का टाकतेस?’; छत्रपती संभाजीनगरात तृतीयपंथीयावर चाकूने हल्ला

Petrol-Diesel Update: ट्रम्प यांनी शांतता करार नाकारल्यानंतर कच्चे तेल महागले! देशात नवे इंधन दर; पाहा पेट्रोल-डिझेल-CNG कितीला

SCROLL FOR NEXT