Plane Crash 
ग्लोबल

Video...अन् उरली फक्त राख, प्रवासी जिवंत जळाले, विमान अपघातानंतरचा थरकाप उडवणारा व्हिडिओ

Plane Crash In Nepal Kathmandu: विमान पोखरा येथे जात होते. यावेळी विमानात १९ लोक प्रवास करत होते. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी दुर्घटना घडली.

कार्तिक पुजारी

काठमांडू- नेपाळच्या काठमांडूमध्ये भीषण विमान अपघात झाला आहे. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर टेकऑफ करताना एका विमानाचा अपघात झाला. सौर्य एअरलाईन्सचे हे विमान होते. सध्याच्या माहितीनुसार, विमान अपघातात १८ लोकांचा मृत्यू झाला आहे.

द काठमांडू पोस्टने यासंदर्भातील रिपोर्ट दिला आहे. विमान पोखरा येथे जात होते. यावेळी विमानात १९ लोक प्रवास करत होते. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी दुर्घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचावपथक घटनास्थळी पोहोचले होते. मदतकार्य केले जात आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हिडिओ पाहून विमानाचा किती भीषण अपघात झालाय याचा अंदाज येतो. एएनआयच्या एका व्हिडिओमध्ये दिसतंय की, विमानाची पार राख झाली आहे. काहीच शिल्लक राहिलं नाही. त्यामुळे कोणी वाचले असण्याची देखील शक्यता नाहीत. जे काही व्हिडिओ समोर येत आहेत यावरून तेच दिसत आहे. बचावपथक विमानाचे अवशेष हाताने काढत आहे.

घटनेची माहिती मिळताच नेपाळचे पंतप्रधान केपी ओली घटनास्थली पोहोचले आहेत. विमानाचा अपघात झाल्यानंतर त्याला आग लागली होती. माहितीनुसार, पायलट विमानाच्या बाहेर पडला होता. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'Rohit Sharma, विराट कोहली मागील १०-१५ वर्ष खेळत आहेत, आता...'; शुभमन गिल हे असं का म्हणाला? गंभीरच्या विधानानंतर भाई सुटला...

अमिताभ बच्चन यांची मोठी गुंतवणूक; अलिबागमधील 'या' गावात खरेदी केली जमीन; कितीचा झाला व्यवहार?

Video Viral: विराट कोहली ४ महिन्यानंतर मायदेशात परतला; ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियासोबतच रवाना होणार

'ट्रेंड्सपेक्षा कंफर्ट महत्त्वाचा!' अभिनेत्री रिया जोशीचा लाँग स्कर्ट, सिल्व्हर ज्वेलरी आणि साडीतील खास स्टाईल फंडा

Diwali Travel Pune: दिवाळीच्या सुट्टीत फिरायला जायचंय? मग पुण्यातल्या 'या' सुंदर ठिकाणी जा आणि परदेशासारखा अनुभव घ्या!

SCROLL FOR NEXT