Tara Air Aircraft, Nepal esakal
ग्लोबल

नेपाळमध्ये विमान बेपत्ता; भारतीय दुतावासाकडून हॉटलाईन नंबर जाहीर

नेपाळमध्ये तारा एअरलाईनचं विमान बेपत्ता झालं असून यामध्ये चार भारतीय लोक प्रवास करत होते.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : नेपाळमध्ये तारा एअरलाईनचं विमान बेपत्ता झालं असून यामध्ये चार भारतीय लोक प्रवास करत होते. या प्रवाशांच्या माहितीकरीता भारतीय दुतावासानं इमर्जन्सी हॉटलाईन क्रमांक जाहीर केले आहेत. रविवारी सकाळी या विमानानं उड्डाण केलं होतं. उड्डाणानंतर पंधरा मिनिटांतच हे विमान बेपत्ता झालं आहे. (Airlines disappears in Nepal Indian Embassy announces hotline number)

काठमांडू येथील भारतीय दुतावासानं यासाठी आपत्कालीन हॉटलाईन नंबर जाहीर केला आहे. बेपत्ता विमानातून प्रवास करणाऱ्या भारतीयांच्या माहितीसाठी +977-9851107021 या फोन नंबरवर संपर्क करण्याचं आवाहन दुतावासाकडून करण्यात आलं आहे. या आता एअरलाईन्सच्या या विमानातून २२ प्रवाशी प्रवास करत होते ज्यांमध्ये चार भारतीयांचा समावेश आहे. या प्रवाशांच्या कुटुंबियांच्या संपर्कात असल्याचं दुतावास म्हटलं आहे.

जोमसोम (Jomsom) हा डोंगराळ भाग ट्रेक करणाऱ्या परदेशी गिर्यारोहकांसाठी एक लोकप्रिय मार्ग आहे. येथील पूज्य मुक्तिनाथ मंदिराला मोठ्या संख्येनं भारतीय आणि नेपाळी यात्रेकरू भेट देत असतात. नेपाळच्या गृह मंत्रालयाचे प्रवक्ते फदिंद्र मणि पोखरेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालयानं बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी पोखरा येथून मुस्तांग आणि दोन खासगी हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. शोधासाठी नेपाळ लष्कराचे हेलिकॉप्टर तैनात करण्याची तयारीही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Road Clash : मीरारोडमध्ये दोन गटात तुफान हाणामारी; २० रिक्षांची केली तोडफोड, मुलीच्या छेडछाडीवरून झाला वाद

अहान पांडे-शर्वरी वाघच्या चित्रपटाचं शूटिंग यूकेमध्ये, अ‍ॅक्शन आणि रोमांसचा परिपूर्ण संगम

Fake Medicine : औषध भेसळ प्रकरण; दोषी कंपन्यांवर कारवाईची मागणी, विक्रेत्यांना त्रास नको

Pune Crime : पुण्यात दुचाकीस्वार चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेसह तिघांचे दागिने लंपास

Latest Marathi News Live Update : एसटी आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक

SCROLL FOR NEXT