Al Jazeera Journalist killed in Israeli shooting Jerusalem Sakal
ग्लोबल

इस्राईलच्या गोळीबारात पत्रकाराचा मृत्यू

‘अल जझिरा’ची टीका ; मुद्दाम गोळी मारल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

जेरुसलेम : पॅलेस्टीनी दहशतवाद्यांविरोधात जेनिन या शहरात कारवाई करत असताना इस्राईलच्या सैनिकांच्या गोळीबारात ‘अल जझिरा’ या वृत्तवाहिनीच्या ज्येष्ठ पत्रकार शिरीन अबु अक्ला (वय ५१) यांचा मृत्यू झाला. शिरीन यांच्या मृत्यूनंतर इस्राईलवर टीका होत आहे. पॅलेस्टाइन प्रतिनिधी मंडळ आणि ‘अल जझिरा’नेही शिरीन यांच्या मृत्यूसाठी इस्राईललाच जबाबदार धरले आहे. शिरीन या कतारमधील ‘अल जझिरा’ या वृत्तवाहिनीसाठी जेरूसलेममधील प्रतिनिधी म्हणून काम पहात होत्या. इस्राईलच्या पश्‍चिम किनारपट्टीवरील जेनिन शहरातील निर्वासितांच्या छावणीमध्ये लपून बसलेल्या काही संशयित दहशतवाद्यांविरोधात इस्राईलही सैनिक कारवाई करत होते.

या कारवाईचे वार्तांकन करण्यासाठी शिरीन आणि इतर काही पत्रकार घटनास्थळी गेले होते. त्यांनी ‘पत्रकार’ अशी अक्षरे लिहिलेले जॅकेटही परिधान केले होते. कारवाई दरम्यान संशयित दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना इस्राईलच्या सैनिकांनी मारलेली गोळी शिरीन यांच्या हाताला लागली आणि त्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला, असे सूत्रांनी सांगितले. त्यांच्याबरोबर असलेल्या एका स्थानिक वृत्तपत्राच्या पत्रकारालाही पाठित गोळी लागली. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

इस्राईलचे म्हणणे

पत्रकारांवर गोळीबार केल्याचा आरोप इस्राईलने फेटाळून लावला आहे. या प्रकरणी सत्य समोर येण्यासाठी चौकशीची मागणी इस्राईलने केली. तसेच, पत्रकारांना पॅलेस्टीनी दहशतवाद्यांनी मारलेली गोळी लागली असावी, अशी शंकाही इस्राईलने व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एक पेन ड्राइव्ह तपासायला किती वेळ लागतो? २४ तासांत अहवाल द्या, हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं

Udgir Crime : जेवणाच्या बहाण्याने घरात घुसून महिलेवर अत्याचार; आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

युद्धामुळे महागाईचा भडका, सरकारने एक कोटीची नोट छापली, पण बाजारात पिशवीही भरणार नाही; इराणची अर्थव्यवस्था संकटात

विजय वडेट्टीवार यांच्यावर शंभर कोटींच्या मानहानीचा दावा; कुणी दाखल केली याचिका? नेमकं प्रकरण काय?

SRH Viral Video: सिलेक्टर्स ऐकतायेत, जरा सांभाळून... इशान किशनची सर्वांसमोर नितीश रेड्डीला वॉर्निंग; अभिषेक शर्मालाही लागला हसू

SCROLL FOR NEXT