‘अल जझिरा’चा ब्युरो चीफ; सुदानी सैन्याच्या अटकेत sakal media
ग्लोबल

‘अल जझिरा’चा ब्युरो चीफ; सुदानी सैन्याच्या अटकेत

सुदानमधील आपल्या ब्युरो चीफला सुदानी सैन्याने पकडले असल्याचा दावा कतारमधील उपग्रह वृत्तवाहिनी ‘अल जझिरा’ने केला आहे

सकाळ वृत्तसेवा

खार्तुम : सुदानमधील आपल्या ब्युरो चीफला सुदानी सैन्याने पकडले असल्याचा दावा कतारमधील उपग्रह वृत्तवाहिनी ‘अल जझिरा’ने केला आहे. सुदानमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या लष्करी बंडाविरोधात काल (ता. १३) देशभर निदर्शने झाल्यानंतरच या ब्युरो चीफला अटक केली, असा आरोप वाहिनीने केला आहे.

एल मुसाल्मी अल कब्बाशी असे त्याचे नाव आहे. सुदानी सैन्याने त्याच्या घरात घुसून त्याला अटक केल्याचा दावा ‘अल जझिरा’ने ट्विटरवरील निवेदनाद्वारे त केला आहे. सुदानमध्ये काल लष्कराविरोधात निदर्शने झाली.

निदर्शकांना पांगविण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, तर काही ठिकाणी गोळीबारही केला. या गोळीबारात एका युवकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर काही वेळाने कब्बाशी यांना अटक करण्यात आली. या अटकेबाबत सुदानी लष्कराने माहिती दिली नसली तरी वार्तांकन केल्यामुळेच त्यांच्यावर कारवाई झाल्याचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमदार काकांनी केला ठेकेदार पुतण्याचा पर्दाफाश, बनावट कागदपत्रे जोडून जिल्हा परिषदेची फसवणूक; गुन्हा दाखल

Satara Doctor Case: 'आरोपींवर कुठलीही दया दाखवली जाणार नाही', Rupali Chakankar संतापल्या | Sakal News

Latest Marathi News Live Update : भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे वक्तव्य — “आमचे मार्गदर्शक भुजबळसाहेब” म्हणत गोंधळ

Sangli Theft Cases : सांगलीत मंगळसूत्र चोरांची संख्या वाढली, भर बाजारात चोरांनी दिलं पोलिसांना आव्हान

Satara : महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी अंबादास दानवेंचे गंभीर आरोप, थेट भाजपच्या माजी खासदाराचं नाव घेतलं

SCROLL FOR NEXT