Alcohol party Alcohol party
ग्लोबल

जंगलात विद्यार्थ्यांची सुरू होती ड्रग्ज, दारू पार्टी; नंतर...

डझनभर विद्यार्थी घरी जाण्याऐवजी जंगली भागात दारू पिताना पोलिसांना दिसले

सकाळ डिजिटल टीम

केनियातील मुरंगा येथील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दारू पिऊन (Alcohol party) शारीरिक संबंध ठेवताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या घटनेत सहभागी असलेल्या १६ विद्यार्थ्यांना पोलिसांनी घटनास्थळावरून अटक (16 Students Arrested) केली. तर उर्वरित संशयित विद्यार्थ्यांचा शोध पोलिस घेत आहे. ही शाळा देशाच्या गिट्टीतू प्रांतात आहे.

न्यूज पोर्टल Tv47च्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना शाळेतून सणासुदीची सुटी देण्यात आली. बसमध्ये बसून विद्यार्थ्यांनी शाळाही सोडली. परंतु, डझनभर विद्यार्थी घरी जाण्याऐवजी जंगली भागात दारू पिताना आणि सेक्स करताना (Physical Relationship) पोलिसांना दिसले. काही विद्यार्थ्यांना खोलीतून कपड्यांशिवाय पकडले. घटनास्थळी पोलिस अधिकाऱ्यांनी हेरॉईनही जप्त केली. मात्र, विद्यार्थ्यांवर कोणती कलमे लावण्यात आली आहेत, याची माहिती नाही.

पोलिसांना दहा विद्यार्थी दारू पिऊन (Alcohol party) बंद खोलीत सेक्स करताना दिसले. तर इतर विद्यार्थी जवळच्या जंगलात सेक्स करीत होते. या विद्यार्थ्यांना मकुयु पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तेथे त्यांना कोठडीत ठेवण्यात आले. पोलिसांनी अटक केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा आणि शाळेतील कर्मचाऱ्यांचा शोध घेत आहे.

दुसरीकडे याच शाळेच्या बसचा अपघात झाला. यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर डझनभर विद्यार्थी जखमी झाले. अपघातानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुमारे तीन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. उर्वरितांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: NSE IPO लिस्टिंगआधीच शेअर बाजार कोसळला! Sensex 634 अंकानी घसरला; कोणते शेअर्स तोट्यात? NSE IPOचं काय झालं?

‘फक्त टी-शर्ट घालून…’ तुकाराम मुंढेंचा सेलिब्रिटींच्या समर्थनावर सवाल, प्रीती झिंटा-मल्लिकाचा उल्लेख करत म्हणाले

Asian Games 2026: "गोल्ड मिस हो गया"; ३.८८ सेकंदाने सुवर्ण हुकले, ढसाढसा रडला सतनाम; रोशिबिना देवीचे सलग तिसरे पदक

Latest Marathi News Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

India New Zealand Tour : कसोटीच्या तयारीसाठी वनडेतून विश्रांती? ; न्यूझीलंड दौऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे संकेत

SCROLL FOR NEXT