Amazon Layoffs 2023 
ग्लोबल

Amazonच्या सीईओंचा कर्मचाऱ्यांना पुन्हा झटका! ई-मेल पाठवला अन्...

सीईओ अँडी जॅसी यांनी नक्की ई-मेलमध्ये काय म्हटलंय वाचा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : Amazonमध्ये पुन्हा एकदा मोठी कर्मचारी कपात होणार आहे. यावेळी अॅमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी यांनी कर्मचाऱ्यांना थेट ई-मेलद्वारे कामावरुन काढून टाकलं आहे.

अॅमेझॉनमध्ये दुसऱ्यांना होत असलेल्या या नव्या कर्मचारी कपातीमध्ये ९००० जणांना नोकरी गमवावी लागणार आहे. (Amazon CEO cuts 9000 more jobs informs employees through email)

ही नवी कर्मचारी कपात अॅमेझॉनच्या विविध विभागांमध्ये केली जाणार आहे. या कपातीचा AWS, PXT, Advertising आणि Twitch या विभागांना फटका बसणार आहे. सीईओ अँडी जॅसी यांनी आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये याची माहिती दिली आहे.

कॉस्ट कटिंगसाठी जानेवारी महिन्यात अॅमेझॉननं १८००० कर्मचारी कपात केली होती. जॅसी यांनी हे देखील सांगितलंय की, कंपनीनं पहिल्या फेरीत कपातीची घोषणा केली नाही कारण विभागांमधील सर्व कर्मचार्‍यांचे अंतर्गत मूल्यांकन पूर्ण झाले नव्हते.

मूल्यांकन आता पूर्ण झालं असल्यानं कंपनी आणखी 9,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. यामुळं अॅमेझॉन जगभरातील 27,000 कर्मचारी कपात केली आहे.

हे ही वाचा : झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT