Amazon Google
ग्लोबल

ॲमेझॉनची 28 लाखांची फसवणूक ; सांगलीत महिलेने मारला डल्ला

सकाळ वृत्तसेवा

सांगली : ऑनलाईन खरेदीच्या माध्यमातून घेतलेल्या वस्तू घरपोच करणाऱ्‍या ॲमेझॉन कंपनीची (Amazon)तब्बल २८ लाखाची फसवणुक झाली. वस्तू घरपोच करणाऱ्‍यांनी आवश्यकतेपेक्षा जादाची रक्कम ग्राहकाच्या खात्यावर वर्ग करुन ती परस्पर हडपली आहे. याप्रकरणी संशयीत भाग्यश्री नागनाथ पावले (रा.डी मार्टच्या मागे विठ्ठलनगर) हिच्या विरोधात संजयनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून ऑनलाईन खरेदी केलेल्या वस्तूंचे वितरण करणाऱ्‍या एनटेक्स ट्रान्सपोर्ट कंपनीचे बालाजीनगरमध्ये कार्यालय आहे. त्या कार्यालयातील केतन कल्याणराव वाघ (रा. शंभरफुटी, हरिप्रियानगर) यांनी संशयीत भाग्यश्री पावले हिच्या विरोधात फिर्याद दिली. नोव्हेंबर २०२० ते एप्रिल २०२१ या कालावधित १११ ग्राहकांच्या खात्यावर आवश्यकतेपेक्षा जास्त रक्कम वर्ग करुन कंपनीची २८ लाख १० हजार ३०० रुपयांची फसवणुक केल्याचे वाघ यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

ऑनलाईन खरेदी केलेली वस्तू संबधित ग्राहकाच्या घरी पोहच केले जाते. त्यावेळी संबधित वस्तूची किंमत ग्राहकाकडून वसूल केली जाते. त्यावेळी ग्राहकाला परत देण्यासाठी सुटे पैसे नसतील तर कंपनीच्या खात्यावरुन ऑनलाईन पध्दतीने सुटे पैसे ग्राहकाच्या खात्यावर वर्ग केले जातात. नेमका याच संधीचा फायदा घेत संशयीतांनी जादाची रक्कम ग्राहकाच्या खात्यावर वर्ग करुन ती पुन्हा संबधित ग्राहकाकडून रोखीने घेतली आहे. असा प्रकार १११ ग्राहकांच्याबाबतीत घडला आहे. वर्षभरातून एकदा होणाऱ्‍या लेखापरिक्षणातून ही बाब उघडकीस आली आहे. त्यानंतर प्राथमिक चौकशी करुन ट्रान्सपोर्ट कंपनीने संशयीत भाग्यश्री पावले हिच्या विरोधात पोलिसांत फिर्याद दिली आहे. अधिक तपास संजयनगर पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT