ग्लोबल

डिलिव्हरी बॉय असा झाला करोडपती; आता फिरतो 2 कोटींच्या कारमध्ये

सकाळ डिजिटल टीम

ॲमेझॉनच्या एका डिलिव्हरी बॉयने वर्षानुवर्षे मेहनत करून सुमारे 66 हजार रुपये जमवले. त्यानंतर त्याने मोठी रिस्क घेतली. त्याने सर्व पैसे क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवले. आता वयाच्या 28 व्या वर्षी तो करोडपती झाला आहे.

कैफ भट्टी असे या व्यक्तीचे नाव आहे. तो मूळचा ब्रिटनची राजधानी लंडनच्या वेस्ट ड्रेटनचा आहे. त्याने सांगितले की शाळेतील शिक्षकांनी वर्गमित्रांसमोर त्याला 'अपमानित करून चेष्टा केली' होती.

2017 मध्ये विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने ॲमेझॉनसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तो दिवसाचे 14 तास काम करत असे. या कामामुळे कैफला वाईट वाटू लागले आणि आपले आयुष्य असेच राहील असे त्याला वाटू लागले.

पण त्यानंतर कैफने मोठी रिस्क घेतली. त्याने आपली सर्व बचत क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवली. त्यानंतर त्यांनी 'व्हर्ज' नावाच्या नाण्यामध्ये सुमारे 66 हजार रुपये गुंतवले.

लवकरच नाण्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली. या गुंतवणुकीतून त्यांना सुमारे 28 लाख रुपये मिळाले. यानंतर त्याने ॲमेझॉनची नोकरी सोडली. कैफ म्हणाला- माझा विश्वासच बसत नव्हता. इतके पैसे मी यापूर्वी कधीच पाहिले नव्हते.

कैफ पुढे म्हणाला- ही एक अद्भुत अनुभूती होती. मला माझ्या क्षमतेची जाणीव झाली. यामुळे मला क्रिप्टोबद्दल अधिक माहिती गोळा करण्याची प्रेरणा मिळाली. तेव्हाच मी ठरवले की मला आणखी पैसे कमवायचे आहेत. यासाठी मी विचार केला. सुदैवाने, कैफला जोखीम घेण्याचे बक्षीस मिळाले आणि त्याचे उत्पन्न हळूहळू वाढू लागले. Amazon सोडल्यानंतर काही महिन्यांनी त्याने सुमारे 5 कोटी रुपये कमावले आणि एका वर्षानंतर त्याची कमाई दुप्पट झाली.

करोडपती झाल्यानंतर कैफ दुबईला शिफ्ट झाला. आता तो त्याच स्वप्नांतील आयुष्य जगतोय. त्याने स्वतःसाठी तेथे सुमारे 4 कोटी रुपयांना एक पेंटहाऊस अपार्टमेंट आणि सुमारे 2 कोटी रुपयांची मर्सिडीज जी वॅगन कार खरेदी केली.

सुरुवातीला, कैफचे पालक अॅमेझॉनच्या नोकरी सोडण्याच्या निर्णयाच्या बाजूने नव्हते. पण जेव्हा कैफने त्यातून चांगले पैसे कमावायला सुरुवात केली तेव्हा पालकांची विचारसरणी बदलली. कैफ म्हणाला- आई-वडिलांना माझा अभिमान आहे कारण मी इतक्या लहान वयात खूप काही मिळवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT