jeff bezos. 
ग्लोबल

अ‍ॅमेझॉन प्रचंड नफा कमावत असताना जेफ बेझोस यांचा मोठा निर्णय

सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन- कोरोना महामारीच्या काळात प्रचंड नफा कमावणारे अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेफ बेझोस यांनी मोठी घोषणा केली आहे. यावर्षीच्या शेवटापर्यंत पदाचा राजीनामा देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. बेझोस यांनी कंपनीला पत्र लिहून या निर्णयाबाबत माहिती दिली आहे. कोरोना महामारीच्या काळात अनेक व्यावसायिकांना नुकसान सहन करावे लागले. मात्र, टेक जायंट अ‍ॅमेझॉनने प्रचंड कमाई केली. असे असताना जेफ बेझोस यांच्या निर्णयामुळे अनेकांचा आश्चर्य वाटत आहे. 

पुतिन यांनी घेतला बदला? अ‍ॅलेक्सी नवाल्नी यांना कोर्टाने सुनावली कठोर शिक्षा

जेफ बेझोस यांनी पत्रात म्हटलंय की, मी या वर्षीच्या तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये सीईओ पद सोडेन. जेफ बेझोस यांची जागा अँडी जॅसी घेतील. जेसी सध्या अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसचे प्रमुख आहेत. अँडी जॅसी यांना अ‍ॅमेझॉनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी पाहायला मला आवडेल. ते या पदाची जबाबदारी उत्तमरित्या संभाळतील, असं जेफ बेझोस म्हणाले आहेत. अँडी जॅसी यांनी मार्केटिंग मॅनेजर म्हणून 1997 साली सुरुवात केली होती. त्यांनी 2003 मध्ये वेब सर्व्हिसेस AWS ची स्थापना केली. अ‍ॅमेझॉनला मोठा नफा कमवून देणारी ही एक उपशाखा आहे.  

2020 वर्षात टेक कंपनीला मोठा फायदा झाला. अ‍ॅमेझॉनच्या भरारीमुळे जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते. पत्नीला दिलेल्या घटस्फोटामुळे त्यांच्या संपत्तीत काही प्रमाणात घट झाली. बेझोस आपल्या निवेदनात म्हणाले आहेत की, ''अ‍ॅमेझॉन आज जेथे आहे, त्यामागे नव्या संकल्पना आहेत. मी सध्या अ‍ॅमेझॉनला एका चांगल्या स्थितीत पाहतो. त्यामुळे बदलासाठी हीच खरी वेळ आहे.'' अ‍ॅमेझॉनने 31 डिसेंबर 2020 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीसाठी वित्तीय निकाल जाहीर केला. 2020 च्या शेवटच्या तीन महिन्यांत कंपनीने 100 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे.

 दरम्यान, 1995 मध्ये जेफ बेझोस यांनी स्टार्टअप म्हणून अ‍ॅमेझॉन लॉन्च केले होते आणि आज जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये त्यांचा क्रमांक लागतो. जेफ बेझोस यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, हा प्रवास सुमारे 27 वर्षांपूर्वी सुरू झाला होता. अ‍ॅमेझॉन ही केवळ एक कल्पना होती त्याचे नाव नव्हते. त्या काळात मला बर्‍याचदा प्रश्न विचारला जात असे की, इंटरनेट म्हणजे काय? आज आम्ही 1.3 दशलक्ष प्रतिभावान, समर्पित लोकांना नोकरी देतो. कोट्यवधी ग्राहकांना आणि व्यावसायांना सेवा देत आहोत. जगातील सर्वात यशस्वी कंपन्यांपैकी एक म्हणून अ‍ॅमेझॉनची जगात ओळख आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

Nandurbar News: २१व्या शतकातील कटू वास्तव! अपूर्ण पुलामुळे गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नदी पार; प्रसूतीसाठी जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT