ग्लोबल

अमेरिका - शाळेत १५ वर्षीय विद्यार्थ्याकडून गोळीबार; तिघांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

अमेरिकेत पुन्हा एकदा बेछूट गोळीबाराची घटना घडली आहे. एका हायस्कूलमध्ये मंगळवारी झालेल्या गोळीबारात ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेत पुन्हा एकदा बेछूट गोळीबाराची घटना घडली आहे. एका हायस्कूलमध्ये मंगळवारी झालेल्या गोळीबारात ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. एका १५ वर्षीय विद्यार्थ्याने हा गोळीबार केला असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये तिघांचा मृत्यू तर ८ विद्यार्थी जखमी झाल्याचं म्हटलं जात आहे. पोलिसांनी १५ वर्षीय हल्लेखोर विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून एक हँडगनसुद्धा जप्त करण्यात आली आहे.

शेरिफ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्सफर्ड हायस्कूलमध्ये हा हल्ला झाला. दुपारनंतर झालेल्या या हल्ल्यात एका शिक्षकासह सहा जण जखमी झाले आहेत. डेट्रॉइटपासून जवळपास ६५ किमी अंतरावर असलेल्या ऑक्सफर्ड शहरात ही घटना घडली आहे. हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही.

काउंटीचे अंडरशेरिफ मायकल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये १६ आणि १४ वर्षांची दोन मुले तर १७ वर्षांच्या एका मुलीचा समावेश आहे. इतर ८ जणांना गोळ्या लागल्या असून यात एका शिक्षकाचा समावेश आहे. जखमींपैकी २ गंभीर असून सहा जणांची प्रकृती स्थिर आहे.

शाळेत हल्ला करताना विद्यार्थ्याने जवळपास १५-ते २० राउंड गोळीबार केले. हल्लेखोर विद्यार्थ्याने एकट्याने हा गोळीबार केला असून त्यामागचे कारण आता पोलिस शोधत आहेत. गोळीबाराची घटना समजताच २५ एजन्सीज आणि जवळपास ६० अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. गेल्या वर्षभरात १०० हून अधिक गोळीबाराच्या घटना अमेरिकेत घडल्या. मात्र ऑक्सफर्ड स्कूलमधील ही घटना सर्वात मोठी होती अशीही माहिती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईकरांच्या लाईफलाईनमध्ये पुन्हा राडा! प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत...; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

आजचे पंचांग 17 जुलै 2026! राहुकाल, शुभ मुहूर्त, चंद्रबळ आणि दिनविशेष

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींनी देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.

Jalgaon Railway Flyover Update : जळगावला आणखी दोन रेल्वे उड्डाणपुलांची चाहूल? 'या' प्रकल्प मार्गावर होऊ शकतो पूल; रेल्वे विभागाकडून महापालिकेत प्राथमिक चाचपणी

बाबो! स्वप्नील जोशीने घेतली ६५ लाखांची टेस्ला; भावनिक पोस्टनं जिंकली चाहत्यांची मनं

SCROLL FOR NEXT