Afgan People Sakal
ग्लोबल

अमेरिका, ब्रिटनची अखेरची उड्डाणे बाकी; शेकडो जण प्रतीक्षेत

काबूल विमानतळाबाहेर काल (ता. २६) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काही काळ थांबविण्यात आलेली सुटका मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

पीटीआय

काबूल - काबूल विमानतळाबाहेर (Kabul Airport) काल (ता. २६) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Terror Attack) काही काळ थांबविण्यात आलेली सुटका मोहीम (Campaign) पुन्हा सुरू करण्यात आली आहे. अद्यापही शेकडो नागरिक अफगाणिस्तानात (Afghanistan) अडकून पडले असून त्यांना लवकरात लवकर सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी या मोहिमेचा वेग वाढविण्यात येणार असल्याचे अमेरिकेने सांगितले.

काबूलमध्ये ‘इसिस-खोरासन’ या दहशतवादी संघटनेने केलेल्या दोन आत्मघाती हल्ल्यांमध्ये शंभरहून अधिक जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये काही अमेरिकी सैनिकांचाही समावेश आहे. हल्ला होण्याचा अंदाज गुप्तचरांनी वर्तविल्यानंतर अमेरिकेसह, ब्रिटन, फ्रान्स, कॅनडा या देशांनी आपल्या नागरिकांना विमानतळावरून बाहेर पडण्याचा आणि सुरक्षितस्थळी थांबण्याची सूचना केली होती. या सर्व लोकांना ३१ ऑगस्टच्या आत काबूलमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सुटका मोहिम वेळेवर संपविण्यास तालिबानने सांगितले आहे.

आज इटली, अमेरिका, ब्रिटन या देशांच्या विमानांनी आपल्या देशांच्या नागरिकांसह काही अफगाण नागरिकांनाही देशाबाहेर सुरक्षित नेले. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी आपली सुटका मोहिम गुंडाळली आहे. कालप्रमाणे आणखीही हल्ले होण्याचा इशारा गुप्तचरांनी दिला आहे. हल्ला होऊनही आज विमान उड्डाणे सुरु होताच लोकांनी विमानतळाच्या प्रवेशद्वारांबाहेर पुन्हा गर्दी करण्यास सुरुवात केली. कालच्या तुलनेत आज गर्दी अधिक होती.

देश आणि मोहिमा

इटली : अखेरच्या विमानाद्वारे १०९ अफगाणी नागरिकांना आज रोममध्ये आणले. मोहिम समाप्त.

स्पेन : दोन लष्करी विमाने काबूलहून दुबईत आज सकाळी दाखल. सुटका मोहिम समाप्त.

ब्रिटन : ब्रिटिश नागरिक आणि अर्ज मंजूर झालेल्या अफगाणी नागरिकांना परत आणणार. सुटका मोहिम अंतिम टप्प्यात.

जपान : सर्व जपानी नागरिकांना आजच परत नेण्यासाठी प्रयत्न. मोहिम अंतिम टप्प्यात.

अमेरिका : ३१ ऑगस्टच्या आतच मोहिम संपविण्याचा इरादा. अद्याप एक हजार अमेरिकी नागरिक काबूलमध्ये.

आयर्लंड : अद्याप ६० नागरिक काबूलमध्ये.

फ्रान्स : आज मोहिम संपविणार.

रशिया : मोहिम सुरु ठेवणार.

मोहीम समाप्त : जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वीडन, बेल्जियम, हंगेरी, डेन्मार्क, स्वित्झर्लंड, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पोलंड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur ACB Raid : 'खुशाल' जगण्याचा हव्यास, निवृत्त अधिकाऱ्याच्या घरावर रेड; मूळ संपत्तीपेक्षा ७६ टक्के संपत्ती कमावली

Stock Market Updates: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी 25,100च्या जवळ, कोणत्या शेअर्समध्ये विक्री?

Latest Marathi News Live Update : डॉक्टरांच्या चिट्ठी शिवाय 'सिरप' विक्री करू नये, अन्न व औषधी विभागाच्या सुचना

Diwali 2025: दिवाळीला घरात अजिबात ठेवू नका 'या' वस्तू, नाहीतर वर्षभर जाणवेल पैशांची चणचण

Tata Capital IPO: टाटा कॅपिटलच्या IPOमध्ये गुंतवणूक करण्याचा शेवटचा दिवस; IPO 'ब्लॉकबस्टर' ठरणार का?

SCROLL FOR NEXT