america joe biden administration approves f16 fighter jet sustainment programme to pakistan  
ग्लोबल

अमेरिकेची पुन्हा पाकला मदत; 450 मिलियन डॉलरच्या F-16 डिलला दिली मंजूरी

सकाळ डिजिटल टीम

अमेरिकेने F-16 फायटर जेट फ्लीटच्या देखभालीसाठी पाकिस्तानला USD 450 मिलीयन (रु. 3600 कोटी) ची मदत मंजूर केली आहे. बिडेन प्रशासनाने ट्रम्प प्रशासनाचा निर्णय फिरवत पाकिस्तानला F-16 लढाऊ विमानासाठी 450 दशलक्ष डॉलर्सच्या उपकरणे खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

अमेरिकेकडून पाकिस्तानला ही आर्थिक मदत दिली जात आहे जेणेकरून ते सध्याच्या आणि भविष्यात दहशतवादविरोधी धोक्यांचा यसस्वीपणे सामना करू शकतील. गेल्या चार वर्षांत पाकिस्तानला दिलेली ही सर्वात मोठी सुरक्षा मदत आहे. F-16 फायटर जेटच्या मदतीने पाकिस्तानने भारताचे मिग-21 विमान पाडल होते असे मानले जाते.

अल कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरीवरील हल्ल्यात मदत केल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला ही भेट दिली असल्याचे बोलले जात आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने सांगितले की, त्यांनी पाकिस्तानला F-16 लढाऊ विमानांच्या देखभालीसाठी संभाव्य विदेशी लष्करी विक्रीला मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरुन पाकिस्तानी हवाई दलाला सध्याच्या आणि भविष्यातील दहशतवादाच्या धोक्यांना प्रतिसाद देण्याची क्षमता टिकवून ठेवण्यात मदत होईल.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2018 मध्ये पाकिस्तानला सर्व संरक्षण आणि सुरक्षा सहाय्य स्थगित करण्याची घोषणा केल्यानंतर पाकिस्तानला दिलेली ही पहिली मोठी सुरक्षा मदत आहे. 2018 मध्ये ट्रम्प प्रशासनाने दहशतवादी गट, अफगाण तालिबान आणि हक्कानी नेटवर्कवर कारवाई करण्यात अपयशी ठरल्याबद्दल पाकिस्तानला सुमारे 2 अब्ज डॉलरची आर्थिक मदत थांबवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway Station: "थोरले बाजीराव पेशवे पुणे स्टेशन… "; रेल्वे स्थानकावर झळकले बॅनर, राज्यात नवा वाद पेटला!

Latest Maharashtra News Updates : शिवरायांनी महाराष्ट्रात स्वराज्याचे संस्कार रुजवले- शाह

Ind Vs Eng: हेझलवूडचा सल्ला मानला अन् आकाश दीपनं उडवली इंग्लंडची भंबेरी, काय होतं सिक्रेट?

Kolhapur : भूत काढण्याच्या बहाण्याने बेदम चोप, भोंदूबाबाकडून प्रसादाच्या नावाने लूट; कोल्हापूर अंधश्रद्धेच्या अडकत आहे का?

Ahilyanagar Accident:'टाकळीमियाच्या दिंडीला भीषण अपघात'; पिकअपच्या धडकेत ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली; नऊ वारकरी जखमी

SCROLL FOR NEXT