America now crosses 50,000; 3176 deaths in last 24 hours 
ग्लोबल

अमेरिका आता 50 हजार पार ; गेल्या 24 तासात 3176 लोकांचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

 वाशिंग्टन (अमेरिका): जगभरात कोरोनाने थैमान घातले असून याचा सर्वात जास्त फटका जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेला बसला आहे. एकट्या अमेरिकेत सध्या 8,86,709 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त असून त्यातील मृतांचा आकडा आता 50,243 च्या पुढे पोहचला आहे. अमेरिकेतील सर्वच प्रांतात कोरोनाने धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस हा आकडा वाढतच चालला आहे. सध्या अमेरिकेतील 47,75,625 लोकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली असून सध्या अमेरिकेत 7,50,544 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अमेरिकेत आतापर्यंत 85,922 लोकांनी कोरोनावर मात करून पूर्णपणे बरे झाले आहेत. अमेरिकेतील संशोधकांनी येणाऱ्या काळात हि परिस्थिती अजून बिकट होण्याची शक्यता वर्तविली आहे. 

एकट्या न्यूयॉर्कमध्ये 27 लाख लोकांना होणार कोरोनाचे संक्रमण?

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात 27 लाख लोकांना कोरोनाचे संक्रमण होण्याची भीती तेथील गव्हर्नर अँड्र्यू क्यूयो यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली आहे. गुरुवारी तीन हजार लोकांची कोरोनाची चाचणी न्यूयॉर्क मध्ये करण्यात आली असून त्यातील 13.9 % लोकांना कोरोनाचे संक्रमण असल्याचे स्पष्ट झाले आहे. जर हीच परिस्थिती पुढील काही दिवस राहिली तर न्यूयॉर्कमध्ये 27 लाख लोकांना संक्रमण होण्याची आशंका आहे. 

अमेरिकेत येणाऱ्या दिवसांत परिस्थिती अजून खराब होणार

अमेरिकन रोग नियंत्रण केंद्राचे अधिकारी रॉबर्ट रेडफिल्ड यांनी येणाऱ्या काळात अमेरिकेची स्थिती अजून खराब होणार आहे असे मत व्यक्त केले आहे. देशात येणारी कोरोनाची दुसरी लहर हि अतिशय भयानक असण्याची भीती सुद्धा त्यांनी व्यक्त केले आहे. येणाऱ्या काळात अमेरिकेत थंडी वाढणार असून यामुळे संपूर्ण अमेरिकेत तापाची साथ पसरू शकते अशी भीती रॉबर्ट यांनी व्यक्त केली आहे. 

माणसे सोडा आता प्राण्यांना कोरोनाची धास्ती:


जगभरात कोरोनाच्या संसर्गाने सर्व त्रस्त असताना आता याचा धोका प्राण्यांना सुद्धा असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेत  5 एप्रिलला एका वाघाची कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आल्यानंतर सर्वत्र प्राण्यांबाबतीत चिंता व्यक्त करण्यात येत होती. काळ एका दिवसात न्यूयॉर्क मधील एका प्राणी संग्रहालयातील चार  वाघ आणि तीन सिंहांची कोरोनाची चाचणी पॉजिटीव्ह आली आहे. सध्या अमेरिकेत एकूण 8 प्राण्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs LSG Live: अजिंक्य रहाणेच्या मेहनतीवर सहकाऱ्यांनी फिरवले पाणी; लखनौला दिली पुनरागमनाची संधी, कोलकातात मोठा ड्रामा

Deglur NCP leadership change: देगलूर राष्ट्रवादीत खांदेपालट; शिवाजीराव कनकंटे तालुकाध्यक्ष, मंगल आलुरकर व नारायण पाटील यांना जिल्हा उपाध्यक्षपदाची बढती

High Court on TET : अल्पसंख्याक शाळांमध्ये टीईटी बंधनकारक नाही; उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण, शिक्षकांना दिलासा

Mumbai Airport Fire: मुंबई विमानतळावर आग; शॉर्टसर्किटमुळे घटना घडल्याचा अंदाज

KKR vs LSG Live: चर्चा तर होणारच... अजिंक्य रहाणेचा अतरंगी Six! रिषभ पंतच्या मास्टरस्ट्रोकने LSG ला विकेट मिळवून दिली Video Viral

SCROLL FOR NEXT