covaxin sakal
ग्लोबल

अमेरिकेत कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या-तिसऱ्या टप्प्यातील चाचणीवर बंदी

कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या-तिसऱ्या टप्प्यातील चाचणीवर बंदी

सकाळ डिजिटल टीम

हैदराबाद : जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) भाष्यानंतर अमेरिकेने भारत बायोटेकच्या कोविड-१९ प्रतिबंधक लस कोव्हॅक्सिनचे दुसऱ्या-तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी थांबवली आहे. डब्ल्यूएचओने अमेरिकन खरेदी एजेन्सींच्या माध्यमातून कोव्हॅक्सिनचा (Covaxin) पुरवठा थगित केला होता. संघटनेच्या निरीक्षकांना भारत बायोटेक कोविड लसीत उणीवा आढळल्या होत्या. अमेरिका आणि कॅनडा करिता कोव्हॅक्सिनसाठी भारत बायोटेकचे (Bharat Biotech) भागीदार ओकुझेन इंकच्या वतीने मिळालेल्या माहितीनुसार एफडीएचा निर्णय, भारतात कोव्हॅक्सिन उत्पादन संयंत्रांवर जागतिक आरोग्य संघटनेच्या भाष्यानंतर लसीच्या चाचणीत सहभागींना लसींची मात्रा देणे ऐच्छिक रुपात अस्थायी बंदी घालण्याची अमेरिकन कंपनीच्या निर्णयावर आधारित आहे. (America Stopped Second And Third Phase Of Trials Of Covaxin)

ओकुझेनने १२ एप्रिल रोजी म्हटले होते, की हा ओसीयू-००२ च्या सहभागींना लस देणे स्वेच्छाने अस्थायी बंदी घालण्याचा परिणाम आहे. दुसरीकडे भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने (बीबीआयएल) उत्पादन केंद्रांच्या निरीक्षणानंतर आरोग्य संघटनेच्या वतीने मांडलेले म्हणणे समजून घेत आहे.

सूत्रांनी सांगितले, की कंपनीच्या म्हणण्यानुसार संयुक्त राष्ट्राच्या कोणत्याही संस्थेला कोविड-१९ प्रतिबंधक लसींचा पुरवठा केलेला नाही. कोणत्याही शंकेचे निरसन करण्यासाठी एफडीएबरोबर कंपनी काम करेल असे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT